शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

अखर्चित निधीवरून सर्वसाधारण सभा गाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 15:18 IST

जिल्हा परिषदेचा सन २०१७-१८ या आर्थिक वषार्तील ८३ कोटींचा निधी शासन दरबारी जमा झालेला असताना दुसरीकडे, सन २०१८-१९ या आर्थिक वषार्तील आतापर्यंत केवळ ६० टक्के निधी खर्च झाला असल्याचे समोर आले. यावर अध्यक्षा सागंळे यांनी अलिकडेच विभागप्रमुखांची बैठक घेतली

ठळक मुद्देजिल्हा परिषद : अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांकडून संतापबांधकाम विभागाचा सर्वाधिक निधी अखर्चित

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेतील विविध विभागातील अखर्चित निधीवरून अध्यक्ष शीतल सांगळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, निधी अखर्चित ठेवण्यास कारणीभूत असलेल्या अधिका-यांना जाब विचारण्यासाठी मंगळवारी (दि. १९) सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ही सभा चांगलीच गाजण्याची चिन्हे दिसू लागली असून, सर्वसाधारण सभेत घेतले जाणारे निर्णय व त्यावरील कार्यवाहीसाठी प्रशासनानेही दुस-याच दिवशी (दि. २०) रोजी सर्व खातेप्रमुखांची तातडीची बैठक बोलविली आहे.

जिल्हा परिषदेचा सन २०१७-१८ या आर्थिक वषार्तील ८३ कोटींचा निधी शासन दरबारी जमा झालेला असताना दुसरीकडे, सन २०१८-१९ या आर्थिक वषार्तील आतापर्यंत केवळ ६० टक्के निधी खर्च झाला असल्याचे समोर आले. यावर अध्यक्षा सागंळे यांनी अलिकडेच विभागप्रमुखांची बैठक घेतली असता. त्यात सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या आर्थिक वषार्तील प्राप्त निधी व खर्चित निधी याचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. सन २०१७-१८ या आर्थिक वषार्तील ८३ कोटींचा अखर्चित निधी शासनाकडे जमा झाल्याचे सांगण्यात आले. तर, सन २०१८-१९ या वषार्तील प्राप्त झालेल्या ४६८.५० कोटीपैकी २३८ कोटींच (६० टक्के) खर्च झाल्याचे सांगण्यात आले. तर, सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील निधीच प्राप्त झालेले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. यातही बांधकाम विभागाचा सर्वाधिक निधी अखर्चित असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महिला बालकल्याण, ग्रामपंचायत विभागाचा निधी हा अखर्चित असल्याचे सांगण्यात आले. त्यावरून सांगळे यांच्यासह पदाधिका-यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी भूवनेश्वर एस. यांना जाब विचारला. दर आठवड्याला खातेप्रमुखांच्या समन्वय सभा घेतात त्यात नेमके काय काम केले जाते अशी विचारणा करून निधी अखर्चित कसा राहिला असे पदाधिका-यांनी खडेबोल सुनाविले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद