शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

चार गावे, दोन वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

By admin | Updated: April 30, 2017 00:19 IST

येवला : तालुक्यात चार गावे आणि दोन वाड्यांना दोन शासकीय टँकरद्वारे पाण्याच्या दररोज आठ खेपा सुरू झाल्या आहेत.

येवला : तालुक्यात चार गावे आणि दोन वाड्यांना दोन शासकीय टँकरद्वारे पाण्याच्या दररोज आठ खेपा सुरू झाल्या आहेत. कॅनाललगतच्या असणाऱ्या शेकडो डोंगळ्यांच्या करामतीमुळे पालखेडचे आवर्तन लांबल्याने येवला तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा अंत न पाहता पालखेडचे आवर्तन लवकर सोडावे, अशी मागणी होत आहे. येवला तालुक्याचे उत्तर-पूर्व भागातील बंधारेदेखील पिण्याच्या पाण्यासाठी भरून देण्याची मागणी होत आहे.चांदगाव, कुसमाडी, बाळापूर, आडसुरेगाव ही चारी गावे आणि सायगाव (महादेववाडी), ममदापूर (तांडा वस्ती) या दोन वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे.शिवाय तालुक्यातील दहा गावांसह दोन वाड्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकऱ्यांकडे मंजुरीसाठी दाखल करण्यात आले आहेत. या दहा गावांमध्ये आहेरवाडी, जायदरे, खैरगव्हाण, खरवंडी, देवळाणे, दुगलगाव, बदापूर, बोकटे, कोळगाव, धामणगाव यांचा समावेश आहे, तर मातुलठाण अंतर्गत, कातुरे वस्ती, बांगर वस्ती, खैरगव्हाण (गोपाळवाडी) या वाड्यांना सध्या तीव्र पाणीटंचाई भासत आहे.देवठाण, वाईबोथी, खरवंडी या तीन गावासह नगरसूल अंतर्गत चार वाड्यावस्ती येथे गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांची संयुक्त समिती संबंधित पाणीटंचाईच्या गावाला पाहणी केली आहे. त्याबाबतदेखील कार्यवाही चालू असल्याची माहिती पंचायत समिती सूत्रांनी दिली. यापाठोपाठ कोळगाव खुर्द, कोळम बुद्रुक, पांजरवाडी, गारखेडा या चार गावांसह कोळम बुद्रूकमधील महादेव वाडी, कोळम खुर्दमधील पिसाळवस्ती, चव्हाण वस्ती या गावांचे प्रस्ताव पाहणीसाठी तहसीलदारांकडे दाखल आहेत. येवला तालुक्यात पाणीटंचाई डोकावू लागली असून, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे स्रोत आटले असून, पाणीटंचाईची जोरदार झळ बसायला सुरुवात झाली आहे. पालखेडचे आवर्तन जर अधिक काळ लांबले तर भीषण पाणीटंचाई जाणवण्याची चिन्हे आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे स्रोत आटले असून, पाणीटंचाईची झळ बसायला सुरु वात झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी पेक्षा अधिक ४८२ मिलीमीटर एवढा पाऊस झाल्याने तुलनेने पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली असली तरी तालुका टँकर मुक्त होण्यासाठी नवीन पाणीस्रोत व साठवण करण्याची गरज नक्कीच आहे. तालुक्यातील येथील विहिरीचा स्रोत आटले आहेत. पाणीटंचाईचे हे ग्रहण कधी सुटणार या खरा प्रश्न आहे. (वार्ताहर)