शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात जाणवू लागली पाणीटंचाईची झळ

By admin | Updated: April 3, 2017 00:44 IST

येवला : तालुक्यात पाणीटंचाई डोकावू लागली असून, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे स्रोत आटल्याने पाणीटंचाईची झळ बसायला सुरु वात झाली आहे

येवला : तालुक्यात पाणीटंचाई डोकावू लागली असून, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे स्रोत आटल्याने पाणीटंचाईची झळ बसायला सुरु वात झाली आहे. तालुक्यातील बाळापूर, कुसमाडी, चांदगाव, ममदापूर व सायगाव येथील महादेववाडी अशी चार गावे व एका वाडीला पाणी टँकरच्या मागणीचा प्रस्ताव येवला पंचायत समितीकडे आला आहे. या गावांपैकी बाळापूर, कुसमाडी व चांदगाव या गावांची स्थळ पाहणी झाली असून, टँकर मंजुरीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ममदापूर व सायगाव येथील महादेववाडीची पाहणी बाकी असून, सोमवारी प्रत्यक्ष पाहणी करून याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ राजापूर, सोमठाणे येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे स्रोत आटले असून, पाणीटंचाईची झळ बसायला सुरु वात झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा अधिक ४८२ मिलिमीटर एवढा पाऊस झाल्याने तुलनेने पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली असली, तरी तालुका टँकरमुक्त होण्यासाठी नवीन पाणीस्रोत व साठवण करण्याची गरज आहे. दरम्यान, पालखेडचे पाणी आवर्तन फिरल्याने शेतीला पुरेसे पाणी मिळाले नसले, तरी अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. राजापूर पाणीपुरवठा योजनेतील विहिरीच्या पाण्याचा उपसा झाल्यानंतर केवळ दोन फूट पाणी येत आहे. आगामी आठ दिवसांत येथेही पाणीटंचाईची चिन्हे आहेत. सोमठाणे येथील विहिरीचा स्रोतदेखील आटला आहे. येवला तालुक्याला लागलेले पाणीटंचाई आणि टँकरचे ग्रहण कधी सुटणार, असा सवाल केवळ अर्थपूर्ण राजकारण करणाऱ्या राजकीय नेत्यांना आता जनता विचारू लागली आहे. गेल्या वर्षी पहिल्या टप्प्यात आॅक्टोबर ते डिसेंबर २०१५ या तीन महिन्यात कुसमाडी, वाईबोथी या दोन गावांसह तालुक्याच्या पूर्व भागातील चार वस्त्यांना पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती ओढवली होती. यंदा सरासरीएवढे पर्जन्यमान झाल्याने आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या तीन महिन्यांच्या पहिल्या टप्प्यात एकाही गावाला पाणीटंचाई भासली नाही.तालुक्यातील काही भागांतील विहिरींची सफाई करून त्याचे पाणी पिण्याव्यतिरिक्तच्या कामासाठी वापरता येईल. सरासरीएवढे पर्जन्य होऊनदेखील पाण्याचे संकट ‘कमतरता आणि अशुद्धता’ असे दुहेरी बाजूने भेडसावत आहे. नियोजनशून्य आणि अनियंत्रित वापरामुळे उपलब्ध पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. पुढच्या पिढीला जलसमस्येमुळे हतबल होण्याची वेळ येऊ नये म्हणून वर्तमानकाळात प्रभावी योजनांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. पाणीसंकटाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले पाहिजे. या दृष्टीने वर्षभरातील विशेष दिवस आणि सप्ताह कृतीयुक्त साजरे व्हावेत. जागतिक जल दिन, प्राणिकल्याण पंधरवडा, पृथ्वी दिन, जागतिक आरोग्य दिन, जागतिक पर्यावरण दिन, परिसर स्वच्छता दिन, कृषी दिन, वन महोत्सव सप्ताह, जागतिक आझोन दिन, जागतिक स्वच्छता अभियान, वन्यजीव सप्ताह, नैसर्गिक आपत्ती निवारण दिन, जागतिक अन्न दिन, राष्ट्रीय पर्यावरण जागृती अभियान, जागतिक जैवविविधता संवर्धन दिन आदि सप्ताह साजरे करून जनजागृती घडविणे आवश्यक आहे. त्यामुळे पाणी समस्या लोकचळवळ बनेल.पाणीप्रश्नाबाबत जनता व शासन उदासीन असल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याअगोदर पाण्याचे कालबद्ध नियोजन करणे व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक बनले आहे. (वार्ताहर)