शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
3
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
5
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
6
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
7
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
8
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
9
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
10
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
11
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
12
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
13
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
14
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
15
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
16
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
17
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
18
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
19
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
20
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
Daily Top 2Weekly Top 5

पालकांना गतिरोधकाची प्रतीक्षा

By admin | Updated: January 21, 2016 22:33 IST

नेहरूनगर : पालकच बजावताहेत वाहतूक पोलिसाची भूमिका

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील सेंट झेविअर्स शाळेसमोरील चौकात पालकच वाहतूक पोलिसाची भूमिका बजावत आहेत. झेविअर्सबरोबर केंद्रीय विद्यालयाचीदेखील शाळा असल्याने महामार्ग ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे या चौकात गतिरोधक बसवावे, अशी कित्येक दिवसांपासून पालकांची मागणी आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदनही देण्यात आले.नाशिक-पुणे महामार्गावर ही शाळा असून, शाळा परिसरात वेगाने येणारे दुचाकीचालक व ट्रकचालक यांच्यामुळे येथे दुर्घटना होण्याची शक्यता वाढली आहे. याबद्दलचे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस नाशिकरोड अध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वी दिले होते. मात्र येथे कुठल्याही प्रकारचे गतिरोधक, फलक व वाहतूक पोलीस कर्मचारी कशाचीही मागणी अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही. सकाळी शाळा भरण्याची वेळ व करन्सी नोट प्रेसची वेळ सारखीच असल्याकारणाने येथे विद्यार्थ्यांचे वारंवार किरकोळ अपघात होत असतात. पालक येथे वाहतूक नियंत्रण करीत असल्याने वाहनधारक व पालक यांच्यात रोज बाचाबाची व भांडणे होत असतात. त्यामुळे येथे एक वाहतूक पोलीस कर्मचारी शाळा भरते वेळी व सुटण्याच्या वेळी नेमण्याची गरज आहे. शाळेजवळ ‘वेगमर्यादा’ व ‘पुढे शाळा आहे’ असे फलक असले पाहिजेत पण येथे असे कोणतेही फलक नाही. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातील कोणत्याही मागण्या पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा एकदा हे निवेदन देण्यात आले आहे. तत्काळ गतिरोधक तसेच वाहतूक पोलीसाची नियुक्ती न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी मुकेश शेवाळे, अमोल लोखंडे, सुहास हांडोरे, प्रमोद खोलमकर, अमोल धावणे, किरण पगारे, ऋषिकेश कोठुळे, प्रशांत खैरनार, निखिल खैरनार, संदेश बच्छाव, इम्रान अन्सारी, शुभम चांदण, प्रसाद डोंगरे, स्वप्नील सोनवणे, सचिन जगताप, कन्हैया पाटील आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)