शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

दोन प्रभागांच्या पोटनिवडणुकीसाठी ९ जानेवारीस मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 1:20 AM

महापालिकेच्या दोन प्रभागांसाठी पोटनिवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, येत्या सोमवारपासून (दि.९) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे, तर दि. ९ जानेवारीस मतदान होणार आहे.

नाशिक : महापालिकेच्या दोन प्रभागांसाठी पोटनिवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, येत्या सोमवारपासून (दि.९) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे, तर दि. ९ जानेवारीस मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहे. विशेषत: महापालिकेत स्थायी समितीसह सर्वच समित्यांवर तौलनिक संख्याबळानुसार सदस्य नियुक्त केले जात असल्याने या दोन्ही जागा मिळविण्यासाठी सर्वच प्रमुखपक्षांची कसरत होणार आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २६ ब मधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर यांनी राजीनामा देऊन मनसेकडून निवडणूक लढविली होती, तर नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक २२ ब मधील भाजप नगरसेवक सरोज आहिरे यांनी राष्टÑवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी राजीनामा दिला. यानंतर सरोज आहिरे या आमदार म्हणून निवडून आल्या असल्या तरी दातीर यांचा मात्र पराभव झाला होता.या दोन्ही प्रभागांसाठी मतदार याद्या अंतिम झाल्यानंतर आता या दोन्ही प्रभागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.इच्छुकांची व्यूहरचना सुरूप्रभाग क्रमांक २६ मधून निवडणूक लढविण्यासाठी मनसेकडून दिलीप दातीर, संगीता दातीर, माकपकडून तानाजी जायभावे, सचिव भोर, भाजपकडून कैलास आहिरे, निवृत्त इंगोळे, अशोक पवार, उखा चौधरी, राष्टÑवादीच्या वतीने मधुकर जाधव, डॉ. ज्योती सोनवणे यांच्यासह अन्य इच्छुक आहेत, तर प्रभाग क्रमांक २२ मध्ये राष्टÑवादीकडून वैशाली दाणी, जगदीश पवार, माधुरी ओहोळ, सुकदेव लोंढे, भाजपकडून रामदास सदाफुले, कॉँग्रेसकडून सारिका कीर, शिवसेनेकडून कुमार पगारे, अमोल आल्हाट यांच्यासह अन्य इच्छुक प्रयत्न करीत आहेत.अधिसूचना दि. १६ रोजी जाहीर होणार, त्याच दिवशीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होईल. दि. १६ ते २३ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल.४ दि. २४ रोजी छाननी, अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत दि. २६ रोजी दि. २७ रोजी निवडणूक चिन्हांचे वाटपा, तर दि.२७ रोजी उमेदवारांची अंतिम वैध यादी , दि.९ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक