शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांनी उपसले बहिष्काराचे शस्त्र!

By admin | Updated: October 16, 2014 00:54 IST

अकोला, वाशिम जिल्ह्यातील तीन गावांचा बहिष्कार.

अकोला- विधानसभा निवडणुकीवर अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील तीन गावांनी म तदानावर १00 टक्के बहिष्कार टाकला. आपल्या गावापर्यंत विकास पोहचलाच नाही, असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दुर्गम भागातील पाच गावांनी मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला होता. त्यात तळेगाव पातुर्डा, बाभूळगाव, तळेगाव वडनेर, डवला आणि सांगवी या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये मूलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थाचे हाल होत असून, प्रशासन लक्ष देण्यास तयार नसल्याने येथील ग्रामस्थांनी बहिष्काराचा मार्ग अवलंबला होता. अधिकार्‍यांच्या मध्यस्थीनंतर तीन गावांतील मतदारांनी बुधवारी मतदान केले; मात्र तळेगाव पातुर्डा आणि बाभूळगाव येथील ग्रामस्थ मतदान केंद्राकडे फिरकलेच नाहीत. वाशीम-मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघाच्या सिमेवर असलेल्या जनुना ग्रामवासी रस् त्याअभावी गैरसोय सहन करीत आहेत. दोन वर्षापूर्वी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्तगत या गावासाठी मंजुर झालेल्या रस्त्याचे काम अर्धवट झाले आहे. ते पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकवेळा आंदोलनाचा इशारा दिला; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी १९ ऑगस्ट रोजी दिला होता. या इशार्‍यावर जनुना ग्रामवासी कायम राहीले. ग्रामस्थांनी मतदान करावे, यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले; मात्र ग्रामस्थांनी दाद दिली नाही.