VIDEO : नाशिकजवळ पॉवर ग्रीड टॉवर कोसळून ३ जखमी

By Admin | Updated: September 10, 2016 14:05 IST2016-09-10T12:56:33+5:302016-09-10T14:05:25+5:30

दिंडोरी येथील लखेड शिवारात पॉवर ग्रीड तर्फे सुरु असलेल्या मनोरा उभारणी करत असताना 300 फुटाचा मनोरा कोसळला असून तीन कामगार जखमी झाले आहेत.

VIDEO: Power grid tower collapsed near Nashik, 3 injured | VIDEO : नाशिकजवळ पॉवर ग्रीड टॉवर कोसळून ३ जखमी

VIDEO : नाशिकजवळ पॉवर ग्रीड टॉवर कोसळून ३ जखमी

ऑनलाइन लोकमत

दिंडोरी (नाशिक), दि. १० - तालुक्यातील वलखेड शिवारात पॉवर ग्रीड तर्फे सुरु असलेल्या मनोरा उभारणी करत असताना 300 फुटाचा मनोरा कोसळला असून तीन कामगार जखमी झाले असून त्यांचेवर दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.या ठिकाणच्या उभ्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने मदत करत कामगारांना टॉवर खालून काढत मदतकार्य केले .बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी त्यास तीव्र विरोध केला होता मात्र प्रशासनाने शेतकऱ्यांचे विरोधाला न जुमानता  टॉवर चे काम सुरु केले मात्र टॉवर उभारणी करत असतानाच कोसळण्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून सदर टॉवर लाईन बागायती क्षेत्र व नागरी वसाहती ऐवजी अन्यत्र भागातून नेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.    

                    

Web Title: VIDEO: Power grid tower collapsed near Nashik, 3 injured