वडनेरभैरवला जोगेश्वरी माता उत्सव

By Admin | Updated: September 29, 2014 00:05 IST2014-09-29T00:05:30+5:302014-09-29T00:05:42+5:30

वडनेरभैरवला जोगेश्वरी माता उत्सव

Vadnare Bhairavala Jogeshwari Mata Festival | वडनेरभैरवला जोगेश्वरी माता उत्सव

वडनेरभैरवला जोगेश्वरी माता उत्सव

वडनेरभैरव : चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथील कुलस्वामींनी जोगेश्वरी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव सलादेबाबा जोगेश्वरी दत्तमंदिरात घटस्थापनेपासून सुरू झाल्याची माहिती नाशिक जिल्हा कुलस्वामिनी जोगेश्वरी माता भक्तमंडळाच्या वतीने दिली
आहे. नाशिक जिल्ह्यातील जाधव, पानगव्हाणे, शेटे, पाचोरकर, सलादे, रसाळ, कावळे यांसह अनेक परिवारांची कुलदेवता असलेल्या जोगेश्वरी मातेचा नवरात्र उत्सव सुरू झाला. वडनेरभैरव सिद्धिविनायक पतसंस्थेचे व्यवस्थापक दिलीप जाधव व सौ. जाधव यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी चांदवड पंचायत समिती उपसभापती मनीषा जाधव यांच्या उपस्थितीत महाआरती झाली. याप्रंसगी डॉ. विक्रम सलादे, नाशिक जनकल्याण सह. बॅँकेचे संचालक पंढरीनाथ पाचोरकर, भैरवनाथ ट्रस्टचे सरचिटणीस सुरेश सलादे, भैरवनाथ ट्रस्टचे संचालक अनिल पवार, आंनदराव साळुंके उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांचा बेलवृक्ष देऊन सत्कार डॉ. विक्रम सलादे यांच्या हस्ते झाला. विजयादशमीपर्यंत दररोज दुर्गासप्तशती, स्त्रोत्रपठण, कुंकमार्चन, सायंकाळी महाआरती असा कार्यक्रम होणार आहेत, तर कोजागिरी पौणिमेला जोगेश्वरी नवचंडी होमहवन होऊन कार्यक्रमाची सांगता होईल पौरोहित्य दीपक मधुकर जोशी हे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Vadnare Bhairavala Jogeshwari Mata Festival