चांदोरी विद्यालयास दोन लाख दहा हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 00:11 IST2021-05-16T00:10:48+5:302021-05-16T00:11:14+5:30

चांदोरी : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी विद्यालयास माजी विद्यार्थ्यांनी दोन लाख दहा हजार रुपयांचा देणगी प्राचार्य सुभाष सोमवशी यांच्याकडे सुपूर्द केली.

Two lakh ten thousand help to Chandori Vidyalaya | चांदोरी विद्यालयास दोन लाख दहा हजारांची मदत

न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी विद्यालयास मदतीचा धनादेश सुभाष सोमवंशी यांच्याकडे सुपूर्द करताना मंगेश वडजे.

ठळक मुद्दे विद्यालयाप्रति मनातील आपुलकीची भावना

चांदोरी : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी विद्यालयास माजी विद्यार्थ्यांनी दोन लाख दहा हजार रुपयांचा देणगी प्राचार्य सुभाष सोमवशी यांच्याकडे सुपूर्द केली. आपण ज्या विद्यालयात शिकलो, संस्कारक्षम बनलो. त्या विद्यालयाप्रति मनातील आपुलकीची भावना व्यक्त करीत मंगेश वडजे व अन्य माजी विद्यार्थ्यांनी देणगी दिली. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने माजी विद्यार्थ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी मंगेश वडजे,आदित्य वडजे, बापू वडजे, सिद्धार्थ वनारसे, माणिक गायखे, संजय गायखे, शिवाजी गडाख, सुखदेव गायखे, शिक्षक विष्णू कोरडे, संजीवकुमार, वसंत टर्ले, सागर गडाख, लक्ष्मण वाघ, संजय भोज आदी उपस्थित होते.
 

Web Title: Two lakh ten thousand help to Chandori Vidyalaya