शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

लहाडेंच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी होणार सुनावणी

By admin | Updated: April 16, 2017 01:19 IST

लहाडेंच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी होणार सुनावणी

नाशिक : बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील संशयित व सरकारी सेवेत असताना विनानोंदणी खासगी रुग्णालय सुरू करणे, नोंदणी कागदपत्रांमध्ये फेरफार व गर्भपाताची औषधे बाळगल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़ वर्षा लहाडे यांच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी (दि़१७) सुनावणी होणार आहे़जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेल्या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात डॉ़ लहाडे यांना निलंबित करण्यात आले आहे़ तसेच म्हसरू ळ पोलीस ठाण्यात सरकारी सेवेत असताना खासगी रुग्णालय, नोंदणी कागदपत्रात फेरफार तसेच गर्भपाताची औषधे यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी लहाडे यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ सी़ शर्मा यांच्या न्यायालयात जामीन अर्ज केला असून, त्यावर शनिवारी (दि़१५) वकिलांचा युक्तिवाद होणार होता़ मात्र, काही कारणास्तव हा युक्तिवाद सोमवारी करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत़जिल्हा रुग्णालयातील गर्भपात प्रकरणात नाशिक महापालिकेचे वैद्यकीय पथक डॉ़ लहाडे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करणार आहे़ शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हे पथक सरकारवाडा पोलीस ठाण्यात हजर झाले व त्यांनी लहाडेंविरोधात गर्भपात कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी तक्रार दिली असून, रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ दरम्यान, डॉ़ लहाडे यांच्यावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातच गर्भलिंग निदान तसेच अवैध गर्भपात वाढीव कलम टाकायचे की स्वतंत्र गुन्हा दाखल करायचा यावर पोलीस अधिकारी कायदेतज्ज्ञांकडून माहिती घेत होते़ (प्रतिनिधी)