शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आज लोकमत ‘दीपोत्सव’ची मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 00:22 IST

संपादन, मांडणी, छपाईची पारंपरिक रिंगणे भेदून दरवर्षी नवनवे प्रयोग करणारा आणि मराठी प्रकाशनविश्वाला एरवी दुर्लभ असलेली ‘लाखाची गोष्ट’ प्रत्यक्षात उतरवण्यात यशस्वी ठरलेला ‘दीपोत्सव’ हा लोकमत वृत्तसमूहाचा बहुचर्चित दिवाळी अंक सर्वत्र उपलब्ध झाला असून, या अंकाच्या निमित्ताने नाशिकमध्ये एका विशेष प्रकाशन-मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक : संपादन, मांडणी, छपाईची पारंपरिक रिंगणे भेदून दरवर्षी नवनवे प्रयोग करणारा आणि मराठी प्रकाशनविश्वाला एरवी दुर्लभ असलेली ‘लाखाची गोष्ट’ प्रत्यक्षात उतरवण्यात यशस्वी ठरलेला ‘दीपोत्सव’ हा लोकमत वृत्तसमूहाचा बहुचर्चित दिवाळी अंक सर्वत्र उपलब्ध झाला असून, या अंकाच्या निमित्ताने नाशिकमध्ये एका विशेष प्रकाशन-मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.‘अंक नव्हे, उत्सव’ असे बिरुद असलेल्या ‘दीपोत्सव’च्या प्रकाशनासाठी मराठी साहित्य-कला क्षेत्रातल्या मान्यवर निमंत्रितांसोबतच लेखक-दिग्दर्शक सचिन कुंडलकर आणि वैभव तत्त्ववादी उपस्थित राहणार आहेत. यावर्षी साडेतीन लाख प्रतींच्या विक्रमी खपाकडे झेप घेत असलेल्या ‘दीपोत्सव’मधल्या एका विशेष लेखाच्या निमित्ताने गप्पांचे हे सत्र होईल.या खुल्या गप्पांची मैफल गुरुवारी (दि. २४) सायंकाळी सहा वाजता विशाखा सभागृह, कुसुमाग्रज स्मारक इथे होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नाशिककर रसिकांना या कार्यक्रमासाठी अगत्याचे आमंत्रण आहे.स्मार्टफोनवर सिनेमाशूट होतो तेव्हा...‘पॉॅॅण्डिचेरी’ हा (कदाचित भारतातला पहिलाच) मराठी सिनेमा नुकताच स्मार्टफोनवर शूट झाला. त्या अनुभवाविषयी सचिन कुंडलकर यांनी यावर्षीच्या ‘दीपोत्सव’मध्ये लिहिले आहे. तो सगळा प्रवास ‘दीपोत्सव’च्या मंचावर उलगडण्यासाठी सचिनच्या बरोबरीने वैभव तत्त्ववादी उपस्थित असतील.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटNashikनाशिक