शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

मिरचीपूड फेकून सोनसाखळी हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:55 IST

शहर व परिसरात जबरी चोरीच्या घटना थांबता थांबत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. पंचवटीत मित्रासमवेत दुचाकीवरून जाणाऱ्या इसमाच्या डोळ्यांवर मिरची पूड फेकून त्यांना मारहाण करत इसमाजवळील रोकड, गळ्यातील सोनसाखळी, अंगठी काढून टोळक्याने पोबारा केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.८) सकाळी दिवसाच्या पहिल्या प्रहरी घडल्याने संताप व्यक्त होत आहे.

पंचवटी : शहर व परिसरात जबरी चोरीच्या घटना थांबता थांबत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. पंचवटीत मित्रासमवेत दुचाकीवरून जाणाऱ्या इसमाच्या डोळ्यांवर मिरची पूड फेकून त्यांना मारहाण करत इसमाजवळील रोकड, गळ्यातील सोनसाखळी, अंगठी काढून टोळक्याने पोबारा केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.८) सकाळी दिवसाच्या पहिल्या प्रहरी घडल्याने संताप व्यक्त होत आहे. यामुळे पंचवटी पोलीस ठाण्याची सुत्रे नव्याने हाती घेतलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपुढे जबरी चोरी, दुचाकी चोरी, घरफोडीसारखे गुन्हे थांबविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.पेठरोडवरील कर्णनगर परिसरात सुनील पवार (४२) हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत रविवारी सकाळी दुचाकीवरून युगंधर चौकातून मार्गस्थ होत होते. यावेळी संशयित नितीन धोत्रे, संतोष पवार, शंकर पवार, दीपक धोत्रे, कैलास येवले, पिंटू येवले या टोळक्याने पवार यांच्या दिशेने मिरचीची पूड भिरकावली. डोळ्यांत मिरची गेल्यामुळे त्यांनी तत्काळ दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबविली. यावेळी टोळक्याने त्यांना लोखंडी रॉडने भर रस्त्यात दिवसाढवळ्या मारहाण करण्यास सुरुवात केली. काहींनी त्यांच्या अंगावर दगडफेकदेखील केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पवार यांच्या खिशातील दहा हजारांचा सॅमसंगचा स्मार्ट मोबाइल, गळ्यातील सोन्याची साखळी, हातातील अंगठी असा ऐवज घेऊन टोळक्याने धूम ठोकली. या घटनेमुळे पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा गुन्हेगारी फोफावल्याचे बोलले जात आहे.महिलेचे मंगळसूत्र चोरट्याने ओरबाडलेनाशिकरोड येथे विवाह समारंभासाठी आलेल्या महिलेचे सुमारे ७० हजारांचे मंगळसूत्र चोरट्याने ओरबाडून पलायन केले. सुनीता मनोहर सोनार (रा. कळवा, मुंबई) या बहिणीसोबत विवाहसोहळ्यासाठी दत्तमंदिर चौकात त्याचवेळी अचानक समोरून दुचाकीवर दोन युवक आले व त्यांनी सोनार यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पलायन केले. सोनार यांनी आरडाओरड केला. परंतु चोरटे दुचाकीवर सुसाट वेगाने गेले.

टॅग्स :PoliceपोलिसRobberyचोरी