शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक

By admin | Updated: August 18, 2016 01:47 IST

कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक

 लोहोणेर : मालेगाव येथे अवैधरीत्या कत्तलीसाठी चार गायी व एक वासरू घेऊन जाणाऱ्या वाहनाचा गेल्या सोमवारी (दि. १५) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने मुद्देमालासह तीन आरोपींना ताब्यात घेतले. याबाबत देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसाका परिसरातून एक पिकअप गाडी (एमएच ०२ वायए ३८५२) अवैधरीत्या गायी घेऊन जात असल्याचा सुगावा लोहोणेर येथील युवक किरण देशमुख, भय्या निकम, आबा सोज्वळ, भिका जाधव, नंदू जाधव, महेंद्र पवार, भारत जाधव, पोलीसपाटील अरुण उशिरे, संजय उशिरे, मनोज जगताप, रोशन अहेर, राजू कुऱ्हाडे यांना लागला त्यांनी घटनास्थळी जाऊन वाहनाच्या चालकाला विचारणा केली असता सदर वाहनचालकाने सुसाट वेगात गायींसह वाहन काढून देवळा शहाराच्या दिशेने पलायन केले. रस्त्यात सदर वाहनाने अनेक गाड्यांना हुलकावणी दिली तसेच लोहोणेर येथील युवकांनी घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस गाडीने वाहनाचा पाठलाग करून मेशी शिवारातील मल्हारवाडी परिसरात वाहन अडविले. अंधाराचा फायदा घेत गाडीतील तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र अंधारात त्यांना शेतातील विहीर लक्षात न आल्याने तिघेही विहिरीत पडले. साधारण ३० फूट पाणी असलेल्या विहिरीत पडलेल्या तिघांनाही देवळा पोलिसांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास बाहेर काढून ताब्यात घेतले. सदर वाहनात चार गायी व एक वासरी असल्याचे निदर्शनास आले असून, अवैधरीत्या मालेगाव येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याने पोलिसांनी वाहनासह गायी व शेख हारु ण शेख, अजहर अहमद इजाज अहमद, अतिक खान खालिद खान या तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिली. दरम्यान, चार गायी व एक वासरी ताहाराबाद येथील गोशाळेत रवाना करण्यात आले. (वार्ताहर)