शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरफाटा खून प्रकरणी तिघांना अटक

By admin | Updated: March 31, 2017 01:05 IST

नाशिकरोड : सिन्नरफाटा येथील फरसाणच्या दुकानातील कामगार कृष्णा नागे यांच्या खून प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी तिघा युवकांना अटक केली आहे.

 नाशिकरोड : सिन्नरफाटा येथील फरसाणच्या दुकानातील कामगार कृष्णा नागे यांच्या खून प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी तिघा युवकांना अटक केली आहे. सिन्नरफाटा येथे बाजीराव भागवत याचे ओम बजरंग फरसाण मार्ट नावाच्या दुकानात कामाला असलेल्या कृष्णा उत्तम नागे (वय ४०, मूळ रा. टाकळी, जिल्हा अकोला) याचा मृतदेह चेहेडी दारणा नदी पुलाजवळील ज्ञानेश्वर गायधनी यांच्या शेताजवळ बुधवारी सकाळी मिळून आला होता. शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये कृष्णा याचा मृत्यू गळा आवळून व डोक्यात कानामागे कुठल्यातरी टणक वस्तुने मारून झाल्याचे स्पष्ट करण्यात आल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.दारू पिण्याचे व्यसन असलेला कृष्णा हा मंगळवारी रात्री ८ वाजता दुकानातुन बाहेर पडल्यानंतर अमोल सूर्यभान सहाणे (३४ रा. भोरमळा सामनगावरोड), पप्पू ऊर्फ अंकुश शिवाजी नाठे (वय ३३, रा. एकलहरा रोड, स्वागत लॉन्सशेजारी), पवन त्र्यंबक बोरसे (वय ३४, रा. ओढारोड भोर मळा) यांच्यासोबत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तिघा संशयितांना त्यांच्या राहत्या घरून चौकशीसाठी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असून, त्यांनी खुनाची कबुली दिली. मयत कृष्णा व संशयित तिघेजण हे मंगळवारी रात्री सिन्नरफाटा येथे दारू पिल्यानंतर शिवाजी पुतळ्यासमोर उड्डाण पुलाखाली स्वच्छतागृहाजवळ पुन्हा दारू पिण्यास बसले. यावेळी त्यांच्यात वादविवाद होऊन शिवीगाळ झाली. त्यानंतर संशयित रिक्षाचालक पवन बोरसे याच्या रिक्षातून अमोल सहाणे, पप्पू ऊर्फ अंकुश नाठे यांनी मयत कृष्णा याला सामनगावरोड भोर मळा येथील अमोल सहाणेच्या घराजवळील एका पडित बंगल्यात नेले. त्यानंतर त्याला मारहाण करून त्याचे डोके भिंतीवर आपटल्याने तो खाली पडला. त्यानंतर त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. (प्रतिनिधी)