सिन्नर तालुक्यात चंदनाची दहा झाडे चोरट्यांनी कापून नेली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 11:18 AM2021-10-22T11:18:52+5:302021-10-22T11:19:27+5:30

Crime News: सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील दुसंगवाडी शिवारातून अज्ञात चोरट्यांनी चंदनाची दहा झाडे कापून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

Thieves cut down ten sandalwood trees in Sinnar taluka | सिन्नर तालुक्यात चंदनाची दहा झाडे चोरट्यांनी कापून नेली

सिन्नर तालुक्यात चंदनाची दहा झाडे चोरट्यांनी कापून नेली

Next

सिन्नर (नाशिक) : तालुक्याच्या पूर्व भागातील दुसंगवाडी शिवारातून अज्ञात चोरट्यांनी चंदनाची दहा झाडे कापून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. सोनवाडी गावालगत रामनाथ बाबुराव ढमाले यांची शेती आहे. त्यांनी पंधरा वर्षापूर्वी सुमारे दीडशे चंदनाची झाडे लावली आहेत. ढमाले शुक्रवारी सकाळी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता चंदनाची दहा झाडे अज्ञात चोरट्यांनी कापून नेल्याची त्यांचे निदर्शनास आले. ढमाले यांनी वावी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद देण्याचे काम सुरू केले होते.

Web Title: Thieves cut down ten sandalwood trees in Sinnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.