शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजारची नोट असून अडचण, नसून खोळंबा

By admin | Updated: November 13, 2016 00:44 IST

तिसऱ्या दिवशीही गर्दी : सुट्टे पैसे मिळत नसल्याने नागरिकांच्या अडचणीत भर

ओझर : केेंद्र शासनाने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करून तीन दिवस झाले. आता त्या बदल्यात मोठ्या नोटांपैकी दोन हजारच्या नोटा नागरिकांना मिळत आहेत. परंतु खुल्या बाजारात लहान नोटांची कमतरता असल्याने दोन हजारच्या नोटा म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा आहे. १०, २०, ५०, १०० च्या नोटांना मागणी वाढली असली तरी तेवढे सुट्टे देण्यास दुकानदार मात्र सकारात्मक नाही. कारण एखाद्याने शंभर किंवा दोनशेचे सामान घेतले आणि दोन हजारची नोट दिली तर त्याला सुटे देण्यासाठी नोटांची जुळवाजुळव करावी लागते. नेमक्या याच कारणामुळे अनेक दुकानदारांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तरी कुणीही दोन हजारच्या नोटा सध्या चलनात आणायला तयार नाही. बँकांमधून वितरित करण्यात आलेल्या शंभरपेक्षा लहान नोटा सामान्य माणसाला पुरत नसून बदलेल्या नोटांमधून रोजचा दैनंदिन खर्च कसा चालवायचा, हा प्रश्न सध्या भेडसावत आहे. तूर्तास बाजार पूर्णपणे ठप्प आहे. कारण ज्यांच्याकडे हातात दोन हजार आहे ते गर्भ श्रीमंत, तर शंभर वाले श्रीमंत अशीच परिस्थिती सध्या दिसून येत आहे.ओझर टाऊनशिप : केंद्र शासनाने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने शनिवारी तिसऱ्या दिवशीही नोटा बदलणे व खात्यावर जमा करण्यासाठी बँकांसमोर सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, एका बँकेत मात्र नोटा बदलून न देता खात्यावर जमा करण्यास सागिंतले जात होते रांगेत उभे राहिल्यानंतर नंबर लागण्यासाठी अडीच तास लागत होते.ओझर टाऊनशिप वसाहतीत असलेल्या स्टेट बँक आॅफ इडिंया, आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक व बँक आॅफ महाराष्ट्रसमोर आज तिसऱ्या दिवशीही नोटा बदलून घेण्यासाठी रांगा होत्या. तर काहीजणांनी नोट्या आपल्या खात्यावर जमा केल्या. रांगेत असलेले सुरवातीचे नागरिक सोडल्यास नंतर रांगेत आलेल्यांना नोटा बदलणे किंवा खात्यात जमा करण्यासाठी कमीत कमी दोन तास वेळ लागत होता. बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये नोटा बदलून दिल्या जात नव्हत्या. रांगेत आलेल्यांकडून फक्त खात्यात पाचशे व हजारांच्या नोटा जमा केल्या गेल्या. या सर्व व्यवहारासाठी आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स केवायसी म्हणून सर्व बँकेत घेण्यात आले. याचा ज्येष्ठ नागरिकांना बराच त्रास झाला. (वार्ताहर)