शेडचे कुलुप तोडुन चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 06:33 PM2020-09-23T18:33:38+5:302020-09-23T18:34:45+5:30

वणी : बांधकाम साईडवरील पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडुन लोखंडी सळई कापण्याचे सहा हजाराचे मशिन चोरु न नेल्या प्रकरणी दिंडोरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Theft by breaking the lock of the shed | शेडचे कुलुप तोडुन चोरी

शेडचे कुलुप तोडुन चोरी

Next
ठळक मुद्देदिंडोरी पोलीसात गुन्हा

वणी : बांधकाम साईडवरील पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडुन लोखंडी सळई कापण्याचे सहा हजाराचे मशिन चोरु न नेल्या प्रकरणी दिंडोरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरी येथील मारु ती मंदिराजवळ राहणारा संशयीत मुन्ना धरमदेव मोहंतो याने लोखंडी सळई कापण्याचे मशिन शेडमधुन चोरु न नेल्याची फिर्याद अमरकुमार जनार्दन यादव यांनी दिल्याने मोहंतो याचेवर दिंडोरी पोलीसांनी गुन्हा दाखल केलाआहे.

दिंडोरीतील व्यक्तीचा अकस्मित मृत्यु
वणी : दिंडोरी कांदा मार्केट येथे दुचाकीवरु न जाणाऱ्या इसमाला चक्कर आल्याने नाशिक येथे दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला.
दिंडोरी येथील शिवाजीनगर येथे वास्तव्यासअसलेल्या नंदु वामन मोरे (६५) हे दुचाकीवरु न घरी जात असताना कांदा मार्केट जवळ त्यांना चक्कर आली. त्यावेळी ते थांबले व दुचाकी रस्त्याच्या कडेला लावतअसताना ते पडले व त्यांना मार लागला. नाशिकच्या एका खाजगी रु ग्णालयात दाखल करण्यातआले मात्र उपचारादरम्यान त्यांंचा मृत्यु झाला. या प्रकरणी दिंडोरी पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Theft by breaking the lock of the shed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.