शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यामुळे मंदिराचा मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 17:58 IST

लोहोणेर : वासोळ रस्त्यावरील पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिराला परिसरातील सांड पाण्याने विळखा घातला असून हे पाणी अक्षम दुर्लक्ष मुळे थेट मंदिरात घुसले आहे. शिवाय हे पाणी पुढे वाहत जाऊन थेट पिण्याच्या पाण्याच्या विहिरीकडे जात आहे.

ठळक मुद्देलोहोणेर : भाविकांना प्रवेशद्वार ओलांडणे झाले अवघड

लोहोणेर : वासोळ रस्त्यावरील पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिराला परिसरातील सांड पाण्याने विळखा घातला असून हे पाणी अक्षम दुर्लक्ष मुळे थेट मंदिरात घुसले आहे. शिवाय हे पाणी पुढे वाहत जाऊन थेट पिण्याच्या पाण्याच्या विहिरीकडे जात आहे.या सांडपाण्यामुळे गेल्या महिन्यापासून मंदिराचे आत प्रवेशद्वार ओलांडणे ही बंद झाले आहे. लोहोणेर येथील जुन्या ऐतिहासिक वारसा असलेल्या गडी वस्ती जवळ गिरणा नदीच्या काठावर पुरातन काळापासूनची हेमाडपंथी महादेवाची दोन मंदिर आहेत. यातील एक मंदिर गिरणातीरी तर दुसरे मालेगाव रस्त्यावर आहे.या मंदिराच्या मागील बाजूस गेल्या महिन्यापासून परिसरातील एका शेतकऱ्याच्या पाईपलाईनला गळती लागली असल्याचे निदर्शनास आले. मात्र या गळतीकडे संबंधित शेतकऱ्यांने दुर्लक्ष केले असल्याने मंदिराच्या पाठीमागे मोठेपाण्याचे तळे साचले असून आता हे पाणी थेट मंदिरात प्रवेश करते झाले आहे.यामुळे येथे गटारगंगा निर्माण झाली असून सदरचे पाणी लोहोणेर गावास पाणी पुरवठा करणाºया विहिरीकडे प्रवाहित झाले असून या रस्त्यावर चोवीस तास पाणीच पाणी असल्याने पादचारी वर्गास मोठा त्रास होत आहे.लोहोणेर येथून गिरणा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात विहिरी खोदून परिसरातील गावातील शेतकºयांनी विहिरी खोदून पाईपलाईनद्वारे आपापल्या शेतात पाणी नेले आहे. मात्र विहिरीतच इतके पाणी आहे, की या वाया जाणाºया पाण्याकडे कोण लक्ष घालतो अशी अवस्था झाली आहे.या अक्षम दुर्लक्षचे चित्र लोहोणेर गावाच्या बाहेरून जाणार्या रस्त्यावर चोवीस तास विविध ठिकाणी वाहत असलेल्या पाईपलाईनच्या गळतीच्या पाण्यावरून सिद्ध होते आहे. यामुळे लोहोणेर गावात दुर्गंधी वाढली असून लोहोणेरकराचे आरोग्य धोक्यात आले आहे.

टॅग्स :TempleमंदिरWaterपाणी