शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

...‘तारे’मुळे वाचली चिमुरडीच्या आयुष्याची दोरी

By admin | Updated: April 29, 2017 02:46 IST

चारवर्षीय चिमुरडीला दोन बिबट्यांनी मानेला धरून उचलून पळवून नेल्यानंतरही शेतात असलेल्या ‘तारां’मध्ये अडकल्याने चिमुरडी बचावल्याची घटना मध्यरात्री घडली.

 शैलेश कर्पे सिन्नरज्याच्या आयुष्याची दोरी बळकट असते ती व्यक्ती यमाच्या तावडीतूनही सहीसलामत बाहेर पडते याचा प्रत्यय तालुक्यातल्या शिवडे शिवारात आला. आई-बापाच्या मध्ये झोपलेल्या चारवर्षीय चिमुरडीला दोन बिबट्यांनी मानेला धरून उचलून पळवून नेल्यानंतरही केवळ काकडीच्या शेतात असलेल्या ‘तारां’मध्ये अडकल्याने चिमुरडी आश्चर्यकारक बचावल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या थरारक घटनेत चारवर्षीय चिमुरडी बचावली असून, तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील मेंढपाळ कुटुंबीय मेंढ्या चारण्यासाठी गेल्या महिन्यापासून तालुक्यात आले आहेत.गेल्या आठ दिवसांपासून या मेंढपाळांचा मुक्काम तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ भागातील शिवडे शिवारातील आनंदा अरुण हारक यांच्या कांदे काढलेल्या शेतात होता. नेहमीप्रमाणे दिवसभर मेंढ्या चारल्यानंतर थकलेले लकडे कुटुंबीय मेंढ्यांच्या कळपाच्या तीनही बाजूने झोपी गेले होते. शिवडे-घोरवड रस्त्यालगत शेतात उघड्यावर झोपलेल्या मल्हारी लकडे व त्यांची पती या दोघांच्या मधोमध त्यांची चार वर्षाची चिमुरडी जनाबाई झोपली होती. रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास अचानक बिबट्यांनी मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. या दोन बिबट्यांसोबत बछडा असल्याचे सांगण्यात येते. बिबट्यांनी जनाबाई हीच्या मानेला धरुन तीला अलगद उचलून पळवून नेले. मात्र जनाबाईचा रडण्याचा आवाज व पाळीव कुत्र्यांनी बिबट्याला दिशेने जोरदार भुंकणे सुरु केल्याने मल्हारी लकडे त्यांची पती व इतर मेंढपाळ जागे झाले. बिबट्यांच्या हल्ल्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. बिबट्यांनी चार वर्षाच्या चिमुरडीला फरफडत ओढत नेण्यास प्रारंभ केला. शेजारीच असलेल्या काकडीच्या शेतात जनाबाईला ओढत नेले. मात्र काकडीच्या शेतात तारा असल्याने त्यात जनाबाई अडकली. कुत्र्यांचे भुंकणे व लकडे कुटुंबियांनी केलेला आरडाओरडा यामुळे बिबट्यांनी तारेत अडकलेल्या चिमुरडीला सोडून धूम ठोकली. लकडे कुटुंबियांनी जनाबाईच्या रडण्याच्या आवाजाच्या दिशेने अंधारात शोधाशोध सुरु केली. सुमारे शंभर फुटावर असलेल्या काकडीच्या शेतात पोटचा गोळा दिसल्यानंतर तीच्या आईवडिलांनी एकच हंबरडा फोडला. बिबट्यांनी जनाबाईला उचलून फरफडत नेल्याने चिमुरडीच्या मान, पाठ व डाव्या गालावर जखमा झाल्या आहेत. तीच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून तीची प्रकृती सुधारत आहे.