राजापूरला रस्त्यावर बाजार; वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 06:35 PM2020-08-02T18:35:30+5:302020-08-02T18:35:52+5:30

राजापूर : राजापूर येथे रविवारचा आठवडे बाजार रस्त्यावर भरत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाला व इतर बाहेरगावाहून आलेले विक्र ेते बसत असल्याने वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते.

Street market to Rajapur; Traffic jam | राजापूरला रस्त्यावर बाजार; वाहतुकीची कोंडी

राजापूरला रस्त्यावर बाजार; वाहतुकीची कोंडी

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना प्रार्दुभाव सुरू असताना या आठवडे बाजारात मोठी गर्दी

राजापूर : राजापूर येथे रविवारचा आठवडे बाजार रस्त्यावर भरत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाला व इतर बाहेरगावाहून आलेले विक्र ेते बसत असल्याने वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते.
येथे आठवडे बाजार भरण्यासाठी चांगले बाजारतळ असतानाही बाजारतळात बाजार न भरविता रस्त्यावर बाजार भरविण्यात येतो. यामुळे वाहतुकी कोंडी होवून ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याने, सदर रस्त्यावरचा बाजार बंद करून, बाजार तळावरच बाजार भरविण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे कोरोना प्रार्दुभाव सुरू असताना या आठवडे बाजारात मोठी गर्दी होते. बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. अनेक विक्र ेते व ग्राहकांकडून मास्कचा वापर केला जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
कोट
राजापूर येथील रविवारचा आठवडे बाजार हा रस्त्यावर भरत असल्याने वाहतुकी मोठी कोंडी होते. यामुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते. रस्त्यावरील हा बाजार बंद करून बाजार तळावरच भरविण्यात यावा. प्रशासनाने कोरोनाच्या पाशर््वभूमीवर याकडे तातडीने लक्ष द्यावे.
- समाधान आव्हाड, ग्रामस्थ, राजापूर
(फोटो : 02राजापूर1)


 

Web Title: Street market to Rajapur; Traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.