शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कारार्थींनी समाज सुदृढतेचे काम करावे शिवाजीराव मोघे

By admin | Updated: August 2, 2014 01:26 IST

: सामाजिक न्याय विभागाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार वितरण

 नाशिक : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी उभे आयुष्य उपेक्षितांंच्या सुधारणेसाठी घालविले. त्यामुळे आज ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत, त्यांनी पुरस्कार मिळाले म्हणजे काम संपले असे न समजता समाज सृदृढ करण्यासाठी सातत्याने काम केले पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले.येथील कालिदास कलामंदिरात सामाजिक न्याय विभागाच्या वतीनेसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार २०१४-१५ च्या वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय सावकारे, आयुक्त रणजितसिंह देओल, सचिव आर. डी. शिंदे, अपंग कल्याण आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, धुळे जि. प. अध्यक्ष सरला पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.शिवाजीराव मोघे यांनी सांगितले की, अण्णा भाऊ साठे यांचे पुस्तक जगातील २७ भाषांत लिहिले गेले आहे. ते मैलोन्मैल पायी प्रवास करून मुंबईला आले. त्यात अंत:करणात व मनात देवत्व होते.पिढयान् पिढ्या रंजलेल्या व गांजलेल्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. अण्णा भाऊ साठे विकास महामंडळासाठी दरवर्षी ७५ कोटींची तरतूद करण्यात येते. लहूजी साळवे आयोगाच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे महामंडळासाठी विकास योजना राबविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. एकाच वेळी सहा शिष्यवृत्त्या आॅनलाइन देण्यात येऊन त्याचे लाभार्थी ३२ लाख विद्यार्थी आहेत. मागासवर्गीयांसाठी या तीन वर्षांत राज्यात सव्वादोन लाख घरकुले बांधलीत. जादूटोणा विधेयकास मंजुरी दिली. तसेच ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांनी काम संपले म्हणून थांबू नये, तर समाज सृदृढ करण्याचे काम केले पाहिजे. छगन भुजबळ यांनी सांगितले की, महाराष्ट्राला दृष्ट्या आणि क्रांतिकारी नेत्यांची परंपरा आहे. या परंपरेतील रत्नांमध्ये अण्णा भाऊ साठे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शिक्षण कमी असतानाही शब्दरूपी निखाऱ्यांतून त्यांनी उपेक्षित समाजामध्ये संघर्षाची जिद्द निर्माण केली. उपेक्षित माणूस ताठ मानेने उभा राहिला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. यावेळी राज्यमंत्री संजय सावकारे व सचिव आर. डी. शिंदे यांनीही अण्णा भाऊ साठे यांचा जीवनपट उलगडविला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवाजीराव पाटील यांनी शाहिरी पोवाडे म्हटले. (प्रतिनिधी)