शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

जेलरोडला सात लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:12 IST

नाशिकरोड : जेलरोड त्रिवेणी पार्क येथील बोरकर नर्सिंगहोमचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने टेबलच्या ड्रॉवरमधून सात लाखांची रोकड चोरून नेली. बिटको कॉलेजमागील शांतीउदय सोसायटीत राहणारे कुलदीप सिंग, प्रदीप कुमार बोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जेलरोड येथील त्रिवेणी पार्क, इंद्रकुटी अपार्टमेंटमध्ये त्यांचे बोरकर नर्सिंग होम दवाखाना आहे.

नाशिकरोड : जेलरोड त्रिवेणी पार्क येथील बोरकर नर्सिंगहोमचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने टेबलच्या ड्रॉवरमधून सात लाखांची रोकड चोरून नेली.बिटको कॉलेजमागील शांतीउदय सोसायटीत राहणारे कुलदीप सिंग, प्रदीप कुमार बोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जेलरोड येथील त्रिवेणी पार्क, इंद्रकुटी अपार्टमेंटमध्ये त्यांचे बोरकर नर्सिंग होम दवाखाना आहे. रविवारी दुपारी दीड वाजता दवाखान्याची दोन्ही शटर व बाहेरील लोखंडी ग्रील व्यवस्थित बंद करून ते घरी गेले. सोमवारी सकाळी दवाखान्यात काम करणाऱ्या सुरेखा मावशी या दवाखान्यात आल्या असता त्यांना दवाखान्याच्या ग्रीलचे गज वाकलेले व शटर उचकटलेले दिसले. सुरेखा मावशी यांनी तत्काळ बोरकर यांना या घटनेची माहिती दिली. बोरकर लागलीच दवाखान्यात आले असता त्यांना दवाखान्यात चोरी झाल्याचे लक्षात आले. अज्ञात चोरट्यांनी दवाखान्याचे ग्रीलचे गज वाकवून शटर उचकटवून दवाखान्यात प्रवेश केला. कन्सल्टिंगरूममधील टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली सात लाखांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.दुचाकीची डिक्की फोडलीडीजीपीनगर येथील साईकृपा अपार्टमेंटमधून दुचाकी गाडी चोरी करून डिक्की फोडून ७५०० रु पये रोख व महत्त्वाचे कागदपत्रे चोरल्याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. डीजीपीनगर संतोषी मातानगर येथील साईकृपा अपार्टमेंटमध्ये राहणाºया जुनेद नूर मोहम्मद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी मध्यरात्री इमारतीच्या पार्किंगमध्ये दुचाकी (एमएच १५ डीबी ८१८३) लावली होती. अर्ध्या तासानंतर कामानिमित्त बाहेर जायचे असल्याने इमारतीच्या पार्किंगमध्ये आलो असता दुचाकी दिसली नाही. शेख यांनी त्याच इमारतीत राहणारे सलिमभाई यांच्यासोबत आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला, परंतु दुचाकी मिळून आली नाही. सोमवारी सकाळी शेख यांनी सोनू खान यांना दुचाकीचोरी गेल्याबाबतची माहिती सांगितली.रात्री पार्किंगमध्ये दुचाकी लावत असताना सुलतान खान व टिपू चांद सय्यद सदर हे त्या परिसरात होते. त्या दोघा संशयितांनी शेख यांची दुचाकी चोरून तिची डिक्की तोडून असलेल्या पाकिटातील साडेसात हजार रु पये रोख, पॅनकार्ड व इतर महत्त्वाचे कागदपत्रे चोरून नेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनगर पोलिस करीत आहेत. दरम्यान परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक