जुलैअखेर स्थायीच्या सात सदस्यांची निवड

By Admin | Updated: July 23, 2014 00:31 IST2014-07-22T22:11:16+5:302014-07-23T00:31:28+5:30

जुलैअखेर स्थायीच्या सात सदस्यांची निवड

Selection of seven permanent members by the end of July | जुलैअखेर स्थायीच्या सात सदस्यांची निवड

जुलैअखेर स्थायीच्या सात सदस्यांची निवड

मालेगाव : येथील महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सात सदस्यांची मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे या जागा रिक्त होणार आहे. या रिक्त जागांसाठी येत्या २८ जुलैच्या महापालिकेच्या महासभेत नाव निश्चित करण्यात येणार आहे.
येथील महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची मुदत दोन वर्ष आहे. त्यामुळे महिनाअखेरीस यातील सात सदस्य निवृत्त होणार असल्याने आयुक्त अजित जाधव यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेतली. त्यात गटनेत्यांना नगरसेवकांच्या संख्येनुसार स्थायी समितीच्या नवीन सदस्यांची अधिकृत नावे सुचविण्यासाठी मार्गदर्शन केले. येत्या २८ जुलै रोजी मनपाची महासभा होत असून, त्यात महापौर ताहेरा शेख यांच्याकडे गटनेत्यांनी बंद पाकिटात नियमानुसार अधिकृत नावे द्यावे, असे आवाहन आयुक्त अजित जाधव यांनी केले आहे. स्थायी समितीत कॉँगे्रस व तिसरा महाजचे प्रत्येकी पाच, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी, मनसे शहर आघाडीचे दोन, मालेगाव विकास आघाडी व जनता दल प्रत्येकी एक अशी सदस्य संख्या आहे. या महासभेत स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यास त्यांची नावे विभागीय महसूल आयुक्तांना कळविण्यात येणार आहेत. तसेच स्थायी समितीच्या सभापतीची मुदत येत्या ४ आॅगस्ट रोजी संपत असल्याने नवीन सभापतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Selection of seven permanent members by the end of July