शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला ६३ ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:49 IST

सिन्नर : तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी १० वाजता जाहीर करण्यात आली. तहसीलदार राहुल कोताडे, ...

सिन्नर : तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी १० वाजता जाहीर करण्यात आली. तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव, प्रशिक्षणार्थी तहसीलदार किशोर मराठे यांच्या उपस्थितीत १९९५ पासूनचा आरक्षणाचा विचार करून आरक्षण सोडत काढण्यात आली.

आरक्षण सोडत पाहण्यासाठी तालुक्यातील गावपातळीवरील नेत्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोठी गर्दी केली होती. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मंडप घालण्यात आला होता. मोठ्या एलएडी स्क्रीनवर सर्वांना दिसेल असे दिसत होते. तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या असल्या तरी २०२०-२५ सालासाठी सर्वच्या सर्व ११४ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत काढण्यात आली. ११४ पैकी ६३ ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण सरपंच असणार आहे. अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी ७, अनुसूचित जमातीसाठी १४ तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ३० गावांचे सरपंचपद काढण्यात आले. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले असले तरी महिला का पुरुष हे ठरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या महिला आरक्षणाची वाट पाहावी लागणार आहे. सन २०२०-२५ सालासाठी पुढीलप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले.

--------------------------

अनुसूचित जाती(७) : दोडी बु, हिवरे, गुळवंच, मोहू/मोहदरी, खोपडी बु/खोपडी खुर्द, पांगरी बु., निमगाव-देवपूर

------------------

अनुसूचित जमाती(१४)-

औंढवाडी, पुतळेवाडी(रामपूर), चिंचोली, धोंडबार, निमगाव-सिन्नर, वडझिरे, मुसळगाव/गुरेवाडी, के. पा. नगर, फुलेनगर(माळवाडी), बेलू, हिवरगाव, पाथरे खुर्द, कोनांबे, पाटपिंप्री.

----------------------

नागरिकांचा मागास प्रवर्ग(३०)-

फर्दापूर, विंचूरदळवी, धारणगाव, वारेगाव, पास्ते, भोकणी, सोमठाणे, बोरखिंड, सोनारी/जयप्रकाशनगर, पिंपळगाव, रामनगर, आटकवडे, पिंपळे, मऱ्हळ बु., पाटोळे, यशवंतनगर(पिंपरवाडी), गुलापूर/मऱ्हळ खु., कासारवाडी, वडगाव-सिन्नर, कहांहळवाडी(शिवाजीनगर), नळवाडी, सांगवी, घोटेवाडी(आशापुरी), पाथरे बु., मेेंढी, मानोरी, नांदूरशिंगोटे, पंचाळे, बारागावपिंप्री, देशवंडी.

--------------

सर्वसाधारण(६३)-

जोगलटेंभी, कारवाडी, कृष्णनगर, नायगाव, श्रीरामपूर(शिंदेवाडी), आडवाडी, सोनगिरी, देवपूर, धुळवड, ब्राम्हणवाडे, खंबाळे, दापूर, जायगाव, वडगाव-पिंगळा, चापडगाव, निऱ्हाळे/फत्तेपूर, जामगाव, टेंभूरवाडी(आशापूर), कोमलवाडी, सरदवाडी, ठाणगाव, सुळेवाडी(सुंदरपूर), चंद्रपूर(खापराळे), पाडळी, माळेगाव/मापारवाडी, सावतामाळीनगर, सोनेवाडी, कुंदेवाडी, पांढुर्ली, चास, दातली, घोरवड, मिठसागरे, भाटवाडी, हरसुले, मिरगाव, शास्त्रीनगर, सोनांबे, कोळगावमाळ, चोंढी, शिवडे, सायाळे, दहीवाडी/महाजनपूर, आगासखिंड, मलढोण, खडांगळी, मनेगाव, दुशिंगपूर, वडांगळी, धोंडवीरनगर, वावी, कीर्तांगळी, डुबेरे, पांगरी खुर्द, उजनी, गोंदे, सुरेगाव, भरतपूर(विघनवाडी)/ लक्ष्मणपूर, शिवाजीनगर, दोडी खुर्द, शहा, दत्तनगर, कणकोरी.

---------------------

फोटो ओळी- सिन्नर तालुक्यात ११४ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत जाहीर करतांना तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव, किशोर मराठे आदी. (२८ सिन्नर१)

फोटो ओळी- सिन्नर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सरपंच आरक्षण सोडत पाहण्यासाठी उपस्थित गावपुढारी. (२८ सिन्नर २)