शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
2
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
3
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
5
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
6
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
7
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
8
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
9
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
10
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
11
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
12
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
13
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
14
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
15
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
16
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
17
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
18
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
19
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
20
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून अभयारण्यांचे द्वार ‘अनलॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 01:12 IST

नाशिक : वन्यजीव विभागाच्या वनवृत्तअंतर्गत येणारे नाशिकचे चारही वन्यजीव अभयारण्य मागील तीन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. स्थानिक गावकऱ्यांशी चर्चा करीत वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी चारही अभयारण्यांचे प्रवेशद्वार कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीच्या अंमलबजावणीच्या अटीवर खुले करण्याचे आदेश मंगळवारी (दि.८) दिले.

ठळक मुद्देवन्यजीव विभागाची घोषणा : नांदूर-मध्यमेश्वर, कळसूबाई, यावल, अनेर डॅमचे द्वार खुले

नाशिक : वन्यजीव विभागाच्या वनवृत्तअंतर्गत येणारे नाशिकचे चारही वन्यजीव अभयारण्य मागील तीन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. स्थानिक गावकऱ्यांशी चर्चा करीत वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी चारही अभयारण्यांचे प्रवेशद्वार कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीच्या अंमलबजावणीच्या अटीवर खुले करण्याचे आदेश मंगळवारी (दि.८) दिले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी शासनाने विविध निर्बंध लागू करीत लॉकडाऊनही घोषित केले होते. कोरोनाची लाट ओसरू लागल्याचे लक्षात आल्यानंतर विविध जिल्ह्यांमधील स्थिती लक्षात घेऊन टप्पेनिहाय तेथील व्यवहार पूर्वपदावर आणण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, नाशिक वनवृत्तामधील निफाड तालुक्यातील रामसर दर्जाचे नांदूर-मधमेश्वर, अहमदनगरचे कळसूबाई-हरिश्चंद्रगड, जळगावचे यावल आणि धुळ्याचे अनेर डॅम अशा चारही अभयारण्यांमध्ये पर्यटकांसह निसर्गप्रेमी वन्यजीव छायाचित्रकारांना अभयारण्यांच्या नाक्यांवर तपासणी करून आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. सध्या नांदूर-मधमेश्वर अभयारण्यात पक्षी निरीक्षणाचा हंगाम नाही, यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी आहे. मात्र, वर्षा सहलींसाठी कळसूबाईसह अन्य अभयारण्यांमध्ये पर्यटक वाढण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या रोजगाराला चालना मिळावी, या उद्देशाने अभयारण्यांचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले केले जात असल्याचे अंजनकर यांनी सांगितले.

भंडारदऱ्याला वाढणार पर्यटकांचा ओघ
पावसाळ्यात कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या भंडारदरा, राजूर वनपरिक्षेत्रात पर्यटकांची संख्या वाढलेली असते. पांजरे, उडदावणे, घाटघर, रतनवाडी या भागांत वन्यजीव विभागाने स्वच्छतागृहांची व्यवस्था ठिकठिकाणी केली आहे. उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी जाऊ नये. अभयारण्यात पावसाळी पर्यटन करताना धोकादायक ठिकाणी ह्यसेल्फीह्ण काढू नये. जागोजागी लावण्यात आलेल्या सूचना फलकांकडे दुर्लक्ष करू नये, कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी केले आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षी पर्यटनाचा सर्वच हंगाम पाण्यात गेला होता. पावसाळ्याचे चार महिने, तसेच काजवा महोत्सवदेखील झाला नव्हता. यावर्षी किमान पावसाळ्याच्या हंगामात पर्यटनामुळे स्थानिकांना लाभ होण्यास मदत होणार आहे. रोजगारामध्ये वाढ होण्यास मदत होईल. वनखात्याने अभयारण्यांमध्ये परवानगी दिल्याने धबधबे बघण्याचा मनमुराद आनंद घेता येणार आहे, तसेच अजून आठवडाभर काजव्यांची चमचमही अभयारण्यात अनुभवायास येऊ शकते.
-केशव खाडे, गाईड, भंडारदरा.

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीSocialसामाजिक