सलादेबाबा स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम

By Admin | Updated: August 21, 2014 00:16 IST2014-08-20T22:31:56+5:302014-08-21T00:16:51+5:30

सलादेबाबा स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम

Salad Baba Memorial Program | सलादेबाबा स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम

सलादेबाबा स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम

चांदवड : आध्यात्मिक गुरु स्व. सलादेबाबा यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त येत्या रविवारी (दि. २४) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय आदर्श बळीराजा गौरव पुरस्कारांच्या वितरणासाठी अभिनेते रमेश देव उपस्थित राहणार असल्याची माहिती सलादेबाबा मंडळाचे अध्यक्ष मनोहर पाटोळे, संस्थापक सुरेश सलादे यांनी दिली.
रमेश देव यांच्या हस्ते कालभैरवनाथ मंदिरात भैरवनाथ पूजा, सलादेबाबा दत्तमंदिरात प्रतिमा पूजन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे पूजन व शोभायात्रा होईल. त्यानंतर मंजुळा मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय आदर्श बळीराजा गौरव पुरस्कारांचे वितरण गौतम बापू पाटील, रमेश देव, गोल्डमॅन पंकज पारख यांच्या उपस्थितीत ८० बळीराजांना गौरविण्यात येईल. यावेळी सलादेबाबा वेबसाइटचे उद्घाटन आमदार शिरीष कोतवाल, लेक बचाव अभियानाचे उद्घाटन खासदार हरिश्चंद्र चव्हाण, पर्यावरण उपक्रमांतर्गत एक झाड माहेरचं या उपक्रमातून बेलवाटप कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार उत्तम भालेराव, जिल्हा मनसेचे प्रमुख प्रकाश दायमा, भाजपा तालुकाध्यक्ष भूषण कासलीवाल, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन अहेर, कादवा अध्यक्ष श्रीराम शेटे, दत्तात्रय पाटील, दिलीप बनकर, ज्योती माळी, संपतराव वक्टे, सरपंच निवृत्ती गांगुर्डे, उपसरपंच सोपान वक्टे, भैरवनाथ ट्रस्ट अध्यक्ष योगेश साळुंके, दिलीप धारराव, अ‍ॅड. पोपटराव पवार, सुरेश माळी, शिवनाथ बोरसे, शंकरराव भालेराव, शरद ढोकरे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मानसिंग ढोमसे, दत्तात्रय निखाडे, गोपाळ उगले, रामचंद्र मोरे, जितेंद्र निफाडे, यशवंत गवळी, श्रीधर जाधव, दीपक पाचोरकर प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)

Web Title: Salad Baba Memorial Program