शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या खजिन्यात ५०६ कोटी रुपये एलबीटी

By admin | Updated: November 18, 2016 00:29 IST

नोटाबंदी : आगाऊ वसुलीबाबत विचारणा

 नाशिक : मोदी सरकारने पाचशे व एक हजारच्या नोटा चलनातून बाद ठरविल्यानंतर महापालिकेला घरपट्टी-पाणीपट्टीसह विविध कर वसुलीसाठी नोटा स्वीकारण्याची परवानगी दिली, परंतु काही बड्या करदात्यांनी एलबीटीबाबतही आगाऊ रकमेचा भरणा करण्याची तयारी दर्शविल्याचे आणि त्याबाबत विचारणा केल्याचे वृत्त आहे. परंतु, एलबीटीची वसुली ही धनादेश स्वरूपातच केली जात असल्याने संबंधितांची अडचण झाली. दरम्यान, महापालिकेच्या खजिन्यात गेल्या सात महिन्यांत एलबीटीच्या माध्यमातून ५०६ कोटी रुपये जमा झाले असून, त्यात शासनाकडून २२१ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. पाचशे-हजारच्या नोटा चलनातून बाद ठरविण्याचा निर्णय घेतला आणि नंतर राज्य शासनाने महापालिकेला करवसुलीसाठी सदर नोटा स्वीकारण्याची परवानगी दिली. त्यानुसार, घरपट्टी, पाणीपट्टी, विविध कर वसुलीसह नगररचनाकडून केली जाणारी शुल्क आकारणी या माध्यमातून महापालिकेच्या खजिन्यात सुमारे १७ कोटी रुपयांची भर पडली आहे. नोटाबंदीवरून सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली असताना काही बड्या करदात्यांनी महापालिकेकडे एलबीटीचाही भरणा करता येईल काय, अशी विचारणा केल्याचे समजते. परंतु, एलबीटी विभागामार्फत दर महिन्याच्या २० तारखेपर्यंत धनादेशामार्फत अथवा आरटीजीएसद्वारे संबंधित कंपन्या, व्यापारी व व्यावसायिक आस्थापना एलबीटीचा भरणा करत असतात.