शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जाचे धनादेश न वटताच परत

By admin | Updated: September 7, 2016 01:17 IST

शेतकरी हवालदिल : जिल्हा बॅँकेचे कानावर हात

नाशिक : चार महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या पीककर्जाचे धनादेश कसेबसे हाती पडलेल्या शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम घेण्यासाठी बँकेत धनादेश वटण्यासाठी टाकले असता, जिल्हा बॅँकेत पैसे शिल्लक नसल्याचे कारण देऊन त्यांना पिटाळून लावण्यात आले. शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधकांकडे धाव घेऊन आपली व्यथा मांडली, तथापि, आश्वासनापलीकडे त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. निफाड तालुक्यातील चांदोरी येथील जवळपास पाचशेहून अधिक शेतकऱ्यांनी मार्च-एप्रिल महिन्यातच चांदोरी विविध कार्यकारी सोसायटीमार्फत जिल्हा बॅँकेकडून पीक कर्ज मंजूर करून घेतले असून, साधारणत: एक ते दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बॅँकेने मंजूरही करून ठेवले व त्यातील २५ टक्के रक्कम आगावू शेतकऱ्यांच्या हातातही टेकविली, त्यामोबदल्यात शेतकऱ्यांच्या जमिनीही तारण ठेवून घेतल्या. दरम्यान, सप्टेंबर महिना सुरू झाल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी बागांची छाटणी व त्यानंतर खत टाकण्याची तयारी सुरू करून त्यासाठी जिल्हा बॅँकेने मंजूर केलेल्या कर्जाची मागणी करण्यास सुरुवात केली असता, प्रारंभी सोसायटीने धनादेश देण्यास नकार दिला. जवळपास महिनाभर शेतकऱ्यांनी सोसायटीचे उंबरठे झिजविल्यानंतर दोन दिवसांपूर्वी गावातील सुमारे पाचशे शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेचे धनादेश वितरीत करण्यात आले, त्यामुळे खुषित असलेल्या शेतकऱ्यांनी धनादेश वटण्यासाठी जिल्हा बॅँकेच्या शाखेत टाकले असता, बॅँकेकडे पैसेच शिल्लक नसल्याचे कारण देत त्यांचे धनादेश परत करण्यात आले. विशेष म्हणजे चांदोरी सोसायटीने गेल्या मार्चमध्येच जिल्हा बॅँकेच्या संपूर्ण कर्जाची परतफेड केली असून, गेल्या पंचवीस वर्षांपासून शेतकरी दरवर्षी बॅँकेकडून कर्ज घेत असताना यंदा मात्र बॅँकेने नकार दिल्याने शेतकरी हवालदिल झाले. त्यांनी थेट जिल्हा बॅँकेत धाव घेऊन बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांची भेट घेऊन व्यथा मांडली, परंतु दराडे यांनी पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केली. बॅँकेला शासनाकडून पैसे मिळाले नाहीत, आम्ही कुठून द्यायचे असा उलट सवालच त्यांनी शेतकऱ्यांना केला. त्यावर कर्ज मिळाले नाही, तर शेतकरी देशोधडीला लागून आत्महत्त्या करतील, असे शेतकऱ्यांनी सांगितल्यावर दराडे यांनी त्यात रस दाखविला नाही, अशी माहिती सुरेश भोज यांनी दिली. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक कुऱ्हे यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनी तक्रार अर्ज द्या, चौकशी करतो असे सांगून बोळवण केल्यावर अखेर संताप अनावर झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले, परंतु जिल्हाधिकारीही बैठकीत व्यस्त होते.