शरद जोशी यांचा पुतळा नामपूरला उभारण्याचा ठराव

By Admin | Updated: December 15, 2015 23:50 IST2015-12-15T23:44:46+5:302015-12-15T23:50:07+5:30

शरद जोशी यांचा पुतळा नामपूरला उभारण्याचा ठराव

Resolution of setting up a statue of Sharad Joshi in Nampur | शरद जोशी यांचा पुतळा नामपूरला उभारण्याचा ठराव

शरद जोशी यांचा पुतळा नामपूरला उभारण्याचा ठराव

नामपूर : येथे शेतकरी प्रणेते शरद जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मंगळवारी शोकसभा घेण्यात आली. या सभेत जोशी यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी नामपूर येथे पुतळा उभारण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला.
येथील बाजार समिती आवारात मोसम खोऱ्यातील सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. यात रामचंद्र पाटील, खेमराज कोर, अशोक सावंत, अण्णा सावंत, दीपक पगार, प्रकाश निकम, विजय सावंत, कृष्णा जाधव, पंडितराव मोरे, विनोद पाटील, संभाजी सावंत यांनी शरद जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी विविध वक्त्यांनी शरद जोशी यांच्या संदर्भातील जुन्या आठवणींना उजाळा देताना या भागात जोशी ज्या ज्या वेळी आले त्यावेळचे प्रसंग आवर्जून नमूद केले.
बागलाण तालुका शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असून, १९८३ च्या ऐतिहासिक आंदोलनात दोन शेतकऱ्यांनी बलिदानही दिले आहे. बागलाणच्या इतिहासात जोशींचे नाव कायम अमर राहील, अशी
प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते पंडितराव मोरे यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)

Web Title: Resolution of setting up a statue of Sharad Joshi in Nampur