शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सात अनधिकृत धार्मिक स्थळे काढणार

By admin | Updated: October 27, 2016 00:12 IST

सात अनधिकृत धार्मिक स्थळे काढणार

नाशिक : न्यायालयाच्या निर्णयानुसार नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या ३१ अनधिकृत धार्मिक स्थळांपैकी आता फक्त सात धार्मिक स्थळे काढण्याची कार्यवाही प्रशासन करीत असून, बुधवारी सिन्नर शहरातील चार स्थळे अशाच प्रकारे काढून टाकण्यात आली आहेत.  अनधिकृत जागेवर तसेच रहदारीला अडथळे ठरू पाहणाऱ्या धार्मिक स्थळांची वर्गवारी करून ती काढून टाकण्याच्या उच्च न्यायालयाच्या सूचना असून, त्यानुसार राज्य सरकारने सर्वच जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना अशा प्रकारच्या धार्मिक स्थळांचा शोध घेऊन कायद्याने ती अधिकृत करता येत असतील तर कायदेशीर करणे व अनधिकृत असतील तर काढून टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नाशिक व मालेगाव या दोन महापालिका वगळता जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३१ अनधिकृत धार्मिक स्थळे आढळून आली होती. त्यापैकी १९ स्थळे अलीकडेच हटविण्यात आली असून, उर्वरित ११ पैकी चार स्थळे बुधवारी सिन्नर येथे काढून टाकण्यात आली.  प्रांत अधिकारी महेश पाटील, तहसीलदार मनोज खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत व नागरिकांना विश्वासात घेऊन ही कार्यवाही करण्यात आली. आता सात स्थळे अनधिकृत असून, ती नांदगाव, मनमाड व बागलाण या ठिकाणी आहेत. न्यायालयाने ३१ आॅक्टोबर ही अंतिम मुदत दिली असल्याने तत्पूर्वी ती काढण्याची कार्यवाही केली जाणार आहे.