शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रेशनचा गहू खुल्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाताना रंगेहात पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 01:59 IST

घोटी : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावीहर्ष येथील रेशन दुकानातून २० गोणीतून रेशनिंगचा गहू खुल्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या वाहनासह ...

ठळक मुद्देवावीहर्ष येथील प्रकार : घोटी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल

घोटी : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावीहर्ष येथील रेशन दुकानातून २० गोणीतून रेशनिंगचा गहू खुल्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या वाहनासह संशयितांना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले. याबाबत पुरवठा निरीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून घोटी पोलीस ठाण्यात गहू कट्टे, वाहन जप्त करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराने इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात खळबळ उडाली असून खुल्या बाजारात रेशनचे धान्य विकणा-यांचे धाबे दणाणले आहे.याबाबत घोटी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की गुरुवारी (दि.५) पहाटेच्या सुमारास वावीहर्ष ता. त्र्यंबकेश्वर येथील रेशन दुकानातून २० प्लास्टिक गोण्यातून प्रत्येकी ३५ किलो गहू ( बाजारभावाप्रमाणे अंदाजे किंमत २० हजार रुपये) गावातीलच (एम एच १५ बीजे-३५६८) जीपमधून वैतरणाच्या दिशेने घेऊन जात असताना श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, सरपंच बाबुराव बांगारे, तालुकाध्यक्ष भगवान डोखे आदींनी पाळत ठेऊन गावाबाहेत पकडला.त्यांनी त्र्यंबकेश्वर तहसील व घोटी पोलिसांना याबाबत फोनवरून माहिती दिल्याने यंत्रणेने तात्काळ धाव घेऊन मुद्देमाल व संशयितांना ताब्यात घेतले. पुरवठा निरीक्षक रमजान तडवी यांनी प्राथमिक स्थितीत हा गहू रेशनिंगचा असल्याचे नमूद करून याबाबत त्र्यंबकेश्वर तहसीलदार दीपक गिरासे यांना माहिती दिली.ऑक्टोबर महिन्यातील कार्डधारकांना वाटप झालेले धान्य वगळून उर्वरित वाटप न झालेले धान्य हे गोण्यात भरून सार्वजनिक वितरण प्रणालीच्या आदेशाचा भंग करून अवैध व विनापरवाना काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने नेला जात असताना अंदाजे २० हजार रुपये किमतीचा गहू व २ लाख रुपये किमतीचे जीप हे वाहन पकडून जप्त करण्यात आले.त्र्यंबकेश्वर पुरवठा निरीक्षक रमजान तडवी यांच्या फिर्यादीवरून रेशन दुकान चालवित असलेल्या महालक्ष्मी बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका हरी डहाळे, धान्य वाटप करणारा हरी शिवराम डहाळे, व जीपचालक संजय सीताराम कडलग यांच्याविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक निरीक्षक जालिंदर पळे, हवालदार कडभाने, रवी जगताप, शीतल गायकवाड, सुहास गोसावी आदी करीत आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारCrime Newsगुन्हेगारी