शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्यांचे दर वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 17:21 IST

नाशिक : जिल्ह्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्यामुळे परिणामी बाजारसमितीमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. यामुळे किरकोळ ...

ठळक मुद्देपावसाचा फटकाआवक घटल्याने दरात वाढकोथिंबीरीच्या जुडीला १०० ते १५० रुपये भाव

नाशिक : जिल्ह्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्यामुळे परिणामी बाजारसमितीमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वधारले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचा माल पुर्णपणे खराब झाल्याने परिणामी बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटत आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव गगणाला भिडले आहेत. पावसामुळे कोथिंबीरीचे मोठे नुकसान झाल्यामुळे कोथिंबीरीच्या जुडीला १०० ते १५० रुपये भाव मिळत आहे.        मागील आठवड्यापर्यंत भाज्यांचे दर आटोक्यात होते पण या आठवड्यात नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये सर्वच भाज्याची आवक घटली असून परिणामी याचा फटका भाज्यांच्या किंमतीवर होतांना दिसुन येत आहे. त्यामुळे सामान्य माणसांच्या जेवणातून भाजीपाला गायब होत आहे. ग्राहक भाजीपाला खरेदी करतांना विचार करुन भाजी विकत घेत आहे. कोथिंबीर, मेथी, शेपू, टॉमेटोचे यांचे भाव वाढले असल्याने ग्राहक या भाज्यांकडे दुर्लक्ष करत इतर भाज्या घेण्यातच समाधान मानत आहे. भेंडी, चवळीच्या शेंगा, वांगे, गवार, दुधी भोपळा, दोडका, फ्लावर,कोबी यांचे दर कायम आहे. आवक पुन्हा वाढल्यास भाव पुन्हा पुर्वपदावर येण्याची शक्यता आहे.पालेभाज्यांचे दरकोथिंबीर : १०० ते १५० रुपये जुडीशेपू : २० ते ३५ रुपये जुडीपालक : १० ते २० रुपये जुडीकांदापात : २० ते ३० रुपये जुडीमेथी : २५ ते ४० रुपये जुडीजादा पाण्यामुळे तसेच वाहतुकीदरम्यान पावसामुळे भाजीपाला सडत असल्यामुळे पालेभाज्यांची आवक घटली आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच शेतकºयांचे नुकसान झाल्याने मार्केटमध्ये हवा तसा भाजीपाला उपलब्ध होत नाही. तसेच आवक घटल्याने मार्केटमध्ये येणाºया जेमतेम भाजीपाल्याला मोठा भाव मिळत असल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव वाढले आहे.गजराबाई गोडसे, भाजीपाला विक्रेती

टॅग्स :Nashikनाशिकvegetableभाज्याMarket Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी