शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस

By admin | Updated: February 11, 2015 02:02 IST

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस

नाशिक : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर मंगळवारी दिवसभर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडला. केजरीवाल यांची कधी ‘सिंघम’, कधी ‘नायक’च्या रूपातील छायाचित्रे, शेर, कवितांची व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर धूम सुरू होती. यानिमित्ताने नेटकऱ्यांच्या सर्जनशीलतेचाही प्रत्यय दिवसभर आला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांनी ७० पैकी ६७ जागा जिंकत पंतप्रधान मोदींना धूळ चारली. देशातील एवढी मोठी घटना सोशल मीडियाला बरेच खाद्य पुरवून गेली. ‘आप’चा ऐतिहासिक विजय दृष्टिपथात येताच सोशल मीडियावर एकाहून एक मिस्कील प्रतिक्रिया उमटू लागल्या. ‘मोदींच्या पराभवाची जबाबदारी बराक ओबामा यांनी स्वीकारली असून, ते राजीनामा देणार आहेत’ इथपासून ते पार ‘मोदींनी स्वच्छ भारत अभियानात झाडूचा प्रचार केल्याबद्दल त्यांना पश्चात्ताप होतोय’, इथपर्यंत नानाविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर झळकत होत्या आणि त्यावर कमेंटही येत होत्या. अरविंद केजरीवाल आणि मोदी यांच्या निरनिराळ्या कार्टून्सनीही लोकांचे चांगलेच मनोरंजन केले. ‘सिंघम रिटर्न्स’ या शीर्षकाखाली अजय देवगणच्या आणि ‘नायक’मधील अनिल कपूरच्या जागी केजरीवाल यांचा चेहरा पेस्ट केलेले पोस्टरही एकमेकांना शेअर केले जात होते. रात्री उशिरापर्यंत अशा मॅसेजेसची देवाणघेवाण सुरू होती. (प्रतिनिधी)