शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी रखडली भूसंपादनाची प्रक्रिया

By admin | Updated: November 18, 2016 00:28 IST

महापालिका : सव्वाशे कोटी रुपयांची गरज

नाशिक : कलम १२७ अन्वये सादर होणाऱ्या नोटिसांचे वाढते प्रमाण, वाढीव मोबदल्याची होणारी मागणी आणि घटत चाललेले उत्पन्न यामुळे महापालिका अडचणीत सापडली असतानाच हाती निधीच शिल्लक नसल्याने आरक्षित जागांच्या संपादनाच्या प्रक्रियेतही अडथळे निर्माण होत आहेत. चालू आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकातील तरतूदच संपल्याने मिळकत विभागाने लेखा विभागाकडे सुमारे १२५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. दरम्यान, आतापर्यंत ५४६ आरक्षणांपैकी ३२ आरक्षणांवर मनपाला पाणी सोडावे लागले आहे. विकास आराखड्यातील एकूण ५४६ आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी महापालिकेला सुमारे पाच हजार कोटी रुपये निधीची गरज भासणार आहे. मात्र निधीअभावी जागा संपादनात येणारे अडथळे, कलम १२७ अन्वये सादर होणाऱ्या नोटिसांचे वाढते प्रमाण, वाढीव मोबदल्याची होणारी मागणी या सर्व बाबींचा विचार करून महापालिका प्रशासनाने आॅगस्ट २०१६ मध्ये आरक्षणांच्या संपादनासाठी एक धोरण तयार करण्याचे निश्चित केले. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येऊन आरक्षणांसंबंधी प्राधान्यक्रम ठरविण्याचाही प्रशासनाने निर्णय घेतला.