शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची निवडणुकीची तयारी

By admin | Updated: January 20, 2017 01:28 IST

रवींद्र सिंघल : संशयित गुन्हेगारांची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार

नाशिक : आगामी मनपा निवडणूक काळात कायदासुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करण्यात आली आहे. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अशा संशयित सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम आखण्यात आली असून, शहर ‘भयमुक्तच’ राहील, अशी ग्वाही पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिली.सन २०१६ मधील वार्षिक गुन्हेगारी नियंत्रण आढावा बैठक पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात आली होती. गुन्हेगारी घटनांचा पोलिसांनी लावलेला छडा आणि न्यायालयात गुन्हे सिद्ध करण्यात आलेले यश तसेच पोलीस प्रशासनाकडून जनता व पोलिसांमधील सुसंवाद वाढविण्यासाठी राबविले जाणाऱ्या लोकाभिमुख उपक्रमांचा आढावा सिंघल यांनी घेतला. उपआयुक्त दत्ता कराळे, विजय पाटील, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त सचिन गोरे, अतुल झेंडे, डॉ. राजू भुजबळ यांच्यासह प्रमुख पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. कुठलीही भीती बाळगण्याची गरज नाही. लोकशाहीचा हक्क निसंकोचपणे बजवावा. कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. गुन्हेगार हा केवळ गुन्हेगारच असतो, त्याचा कुठलाही राजकीय पक्ष नाही किंवा जात -धर्म नाही, असे सिंघल यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)