शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधीपक्षनेतेपदी कविता कर्डक

By admin | Updated: March 19, 2015 00:08 IST

विरोधीपक्षनेतेपदी कविता कर्डक

नाशिक : महापालिकेच्या विरोधीपक्षनेतेपदाचा वाद न्यायप्रविष्ट असताना महापौरांनी बुधवारच्या महासभेत राष्ट्रवादीच्या गटनेत्या प्रा. कविता कर्डक यांची विरोधीपक्षनेतेपदी निवड करत शिवसेनेला धक्का दिला. मनसे-राष्ट्रवादीच्या या खेळीबाबत अंधारात असलेली शिवसेना व विरोधीपक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी महापौरांच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या महासभेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अर्जुन टिळे यांनी सादर केलेल्या पत्रानुसार, महापौर अशोक मुर्तडक यांनी राष्ट्रवादीच्या प्रा. कविता कर्डक यांची विरोधीपक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याचे घोषित केले. संख्याबळानुसार राष्ट्रवादीला हे पद बहाल करण्यात येत असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले. सत्ताधारी मनसेने विरोधीपक्षनेते सुधाकर बडगुजर यांना पायउतार करत शिवसेनेला धक्का दिला असून, येत्या २४ मार्चला होणाऱ्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला खुश ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेत राष्ट्रवादीचे २०, तर शिवसेनेचे १९ सदस्य आहेत. शिवसेनेसोबत निवडणूकपूर्व युती असलेल्या रिपाइंचे ३ सदस्य असल्याने सेनेने अडीच वर्षांपूर्वी २२ संख्याबळाच्या आधारावर विरोधीपक्षनेतेपद पटकाविले होते. दरम्यान, महापौरपदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलत मनसेने राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर पुन्हा सत्ता ताब्यात घेतली. आता स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी-मनसे आणि अपक्ष यांनी एकत्र येण्याचे ठरविले आहे. (प्रतिनिधी)