शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

विंचूर-प्रकाशा महामार्गावरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 18:24 IST

बागलाण तालुक्यातील तरसाळी गावाजवळून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामास बांधकाम विभागाने प्रारंभ केल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांमध्ये समाधान : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने दखल

औंदाणे : बागलाण तालुक्यातील तरसाळी गावाजवळून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामास बांधकाम विभागाने प्रारंभ केल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी गांधीगिरी करत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत वृक्षारोपण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत प्रसिद्ध होताच बांधकाम विभागाने दखल घेत खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहेपरतीच्या पावसामुळे या महामार्गावरील सटाणा ते वरीगावदरम्यान ‘रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठी खड्डे पडून रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. या महामार्गावर अनेकांचा बळी जात असून, प्रवाशांना, वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. महामार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. हा मार्ग गुजरातला जाण्यासाठी जवळच असून, नाशिकहून सुरतकडे मोठी वाहतूक होते. राज्या मार्ग असल्याने अवजड वाहनांची संख्या अधिक आहे. कोणता खड्डा चुकवावा, कसे असा प्रश्न वाहनचालकांना पडत होता. खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात होऊन मोटरसायकलस्वार जखमी आहेत.. या महामार्गावरील प्रवास जीवघेणा ठरत होता. वाहन चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. रात्री खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने गाडी आदळून पाटे तुटणे, पंक्चर होणे, अशा घटना घडत होत्या.

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा