शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित प्रेयसीच्या अंगावर ओतले पेट्रोल

By admin | Updated: October 28, 2016 02:05 IST

विवाहित प्रेयसीच्या अंगावर ओतले पेट्रोल

नाशिक : वेळ - रात्री साडेनऊ वाजेची. ठिकाण - सिटी सेंटर मॉल, उंटवाडी. प्रेयसीने दुसऱ्या मुलाबरोबर विवाह केल्याचा राग आल्याने प्रियकराने तिला अडवून विचारणा करत मारहाण केली आणि पेट्रोल अंगावर ओतून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गेल्या बुधवारी (दि.२६) येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित विवाहिता व संशयित पंकज साहेबराव आहिरे (रा. खुटवडनगर) यांचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यामुळे पीडित महिला व संशयित एकमेकांना ओळखत असून आहिरे याने महिलेला सिटी सेंटर मॉलच्या समोरील रस्त्यावर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अडवून शिवीगाळ केली व मारहाण करत अंगावर पेट्रोल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आहिरेविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यास अटक करुन गुरुवारी (दि.२७) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या सोमवारपर्यंत (दि.३१) पोलीस कोठडी सुनावली आहे.सदर महिला खरेदीसाठी या परिसरात आली असता संशयित आरोपीने तिला अडवून शिवीगाळ केली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी नागरिकांना प्रारंभी दाम्पत्यामध्ये भांडण होत आहे, असे वाटले; मात्र महिलेने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली. यावेळी संशयित आहिरे याने घटनास्थळावरून पलायन केले. त्यानंतर महिलेने गंगापूर पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर अवघ्या काही तासांतच गंगापूर पोलिसांनी आहिरे यास अटक केली.भर रस्त्यात घडला प्रकारसिटी सेंटर मॉल समोरील एका मिठाईच्या दुकानासमोर भर रस्त्यात आहिरे याने विवाहितेला अडवून शिवीगाळ केली आणि मारहाण करीत अंगावर पेट्रोल ओतल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेऊन हस्तक्षेप केला आणि महिलेला सुरक्षित ठिकाणी बसविले. यामुळे महिलेचा जीव वाचला अन्यथा अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.निर्जन रस्त्यांवर गस्त वाढवावीशहरातील रिंगरोड, कॅनॉलरोड आदि ठिकाणी रात्रीच्या सुमारास पोलीस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. निर्जन रस्त्यांवर रात्रीच्या सुमारास विविध जोडपे उभे राहतात आणि आपापसामध्ये वाद-विवाद होऊन भांडण टोकाला जाते. यामुळे पोलीस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.