व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा

By Admin | Updated: July 21, 2014 00:40 IST2014-07-20T23:59:08+5:302014-07-21T00:40:56+5:30

व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा

Personality Development Workshop | व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा

व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा

 नाशिकरोड : विद्यार्थ्यांमध्ये मुलाखतीचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आरंभ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन उपजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रवीण पाटील यांनी केले.
आरंभ महाविद्यालयात उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. आर. भारद्वाज होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागप्रमुख वैजयंती पवार, प्रा. डॉ. समीर लिंबारे उपस्थित होते.
यावेळी प्रशिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, प्राचार्य डॉ. भारद्वाज, डॉ. समीर लिंबारे आदिंनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. टी. डी. बेलदार यांनी स्वयंरोजगार व डॉ. पी. बी. वारकरी यांनी संवाद कौशल्य व मुलाखत तंत्र या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. प्रास्ताविक उपप्राचार्य रेखा टर्ले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. श्रीमती डॉ. एस. एस. कुलकर्णी यांनी केले. आभार प्रा. राजेंद्र शेळके यांनी मानले. यावेळी प्रा. श्रीकृष्ण लोहकरे, प्रा. दीपक पर्वतीकर, प्रा. अक्षया गोसावी, प्रा. जान्हवी शिरवाडकर आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Personality Development Workshop