शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांच्या मुदतवाढीला युतीच्या गटनेत्यांचा विरोध

By admin | Updated: August 2, 2014 01:22 IST

न्यायालयाचा अवमान नको;केंद्राकडे करणार मागणी

नाशिक : येत्या २१ सप्टेंबर रोजी मुदत संपत असलेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच जिल्हा परिषदेतील भाजपा-शिवसेनेच्या गटनेत्यांनी त्यास विरोध केला असून, न्यायालयाने आचारसंहिता काळात या निवडणुका घेण्याबाबत काही अडचण नसल्याचे स्पष्ट केल्याने या निवडणुका वेळेतच व्हाव्यात, अशी मागणी गटनेते केदा अहेर व प्रवीण जाधव यांनी केली आहे.रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कॉँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र मेळाव्यासाठी नाशिकला येत असून, या त्यांच्या नाशिक भेटीत जिल्हा परिषदेचे काही पदाधिकारी त्यांना भेटून जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकांना तीन महिने मुदतवाढ देण्याबाबत विनंती करणार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू आहे. २१ सप्टेंबरला विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपत असून, त्यांना सहा महिने मुदतवाढ मिळणार असल्याची सुरुवातीला चर्चा होती; मात्र नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांना मुदतवाढ दिल्यानंतर शासनाला न्यायालयाने फटकारल्याने ही मुदतवाढ मागे घेऊन नियोजित वेळेतच नगराध्यक्षपदाच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळाची मुदत संपत असून, त्यांच्या निवडणुका २१ सप्टेंबरला होणे अपेक्षित आहे. मात्र या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी आता आघाडीचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच शिवसेना-भाजपा युतीच्या गटनेत्यांनी त्यास कडाडून विरोध केला आहे. पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देऊ नये, यासाठी केंद्रीय पातळीवर ग्रामविकास मंत्रालयाकडे यासंदर्भात मागणी करणार असल्याचे केदा अहेर व प्रवीण जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी) हरिनाम सप्ताहाची सांगतासंगमेश्वर : येथील सावता महाराज मंदिराच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात आला. सोहळ्यात रोज काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, श्री नवनाथ कथा कथन बबन महाराज (धरणगाव) यांनी केले.