उड्डाणपूलावर अपघातात एक ठार तर दोघांचा दुचाकीवरून पडल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 07:19 PM2019-10-30T19:19:17+5:302019-10-30T19:21:15+5:30

या अपघातात एक प्रवाशी जागीच ठार तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

One killed in accident at flyover | उड्डाणपूलावर अपघातात एक ठार तर दोघांचा दुचाकीवरून पडल्याने मृत्यू

उड्डाणपूलावर अपघातात एक ठार तर दोघांचा दुचाकीवरून पडल्याने मृत्यू

Next
ठळक मुद्देएक प्रवाशी जागीच ठार तर चौघे गंभीर जखमीदुचाकीवरून पडून महिला ठार

नाशिक : भरधाव चारचाकी उड्डानपुलावरील दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात १ ठार तर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपूलावरून मुंबईकडून नाशिकच्या दिशेने भरधाव येणारी कार दूभाजकावर आदळून अपघात घडला. या अपघातात एक प्रवाशी जागीच ठार तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अंबड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी (दि.३०) पहाटेच्या सुमारास पाथर्डीफाट्याजवळ उड्डाणपूलावर हा अपघात घडला. देवंद्र प्रतापसिंग भानुप्रतापसिंग (३१, रा. आदिलनगर, लखनऊ) या युवकाचा अपघातात मृत्यू झाला. तसेच जितेंद्रसिंग, सरिता चव्हाण, राखीसिंग व आयुष सिंग हे चौघे गंभीर जखमी आहेत. हे सर्व प्रवाशी लखनऊ येथून नाशिककडे येत असताना बुधवारी पहाटेच्या सुमारास पाथर्डीफाटा येथील उड्डाणपुलावर त्यांची भरधाव इनोव्हा कार (यु.पी.३२, एमएम २०५०) चालविणाऱ्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला जाऊन धडकली. जखमींना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपचार सुरू असताना भानुप्रताप यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषीत केले. तर जखमी चौघांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

दुचाकीस्वाराचा मृत्यू
दुचाकी अपघातात जखमी झालेल्या सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मच्छिंद्र भीामराव पवार (३४, रा. नायगाव) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि.२९) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पवार यांच्या दुचाकीला अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा असताना त्यांचा मध्यरात्रीच्या सुमारास मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.

दुचाकीवरून पडून महिला ठार
दुचाकीवरून प्रवास करताना एक वृद्ध महिला तोल जाऊन जव्हार रस्त्यावर अंबोली फाट्याजवळ कोसळली. या अपघातात जैनाबाई सखाराम शेवरे (६०, रा. आमलोण, ता. पेठ) या सोमवारी दिपावलीनिमित्त मुलगा पुनाजी शेवरे याच्या दुचाकीवर पाठीमागे बसून जव्हारच्या दिशेने प्रवास करत होत्या. अंबोली फाटा येथे खड्डयात दुचाकी आदळल्याने जैनाबाई यांचा तोल गेल्याने त्या रस्त्यावर पडल्या. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. जैनाबाई यांना त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेथून पुढील उपचारासाठी त्यांना नाशिकच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकिय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले.

Web Title: One killed in accident at flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.