जुने सिडको शॉपिंग सेंटर भागात रस्ताच व्यापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:55 AM2019-11-19T00:55:33+5:302019-11-19T00:55:55+5:30

जुने सिडको भागातील शॉपिंग सेंटर येथे भाजीबाजारासाठी गाळे बांधण्यात आले असूनही मुख्य रस्त्यावर भाजीबाजार भरत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होऊन छोटे-मोठे अपघात होत आहेत.

 The old Cidco Shopping Center area covers the road | जुने सिडको शॉपिंग सेंटर भागात रस्ताच व्यापला

जुने सिडको शॉपिंग सेंटर भागात रस्ताच व्यापला

Next

जुने सिडको भागातील शॉपिंग सेंटर येथे भाजीबाजारासाठी गाळे बांधण्यात आले असूनही मुख्य रस्त्यावर भाजीबाजार भरत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होऊन छोटे-मोठे अपघात होत आहेत. याबाबत नगरसेवकांनी अनेकदा प्रभाग सभेत हा प्रश्न उपस्थित केला असतानाही परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याचे चित्र बघावयास मिळाले.
सिडको प्रशासनाच्या वतीने याठिकाणी भाजीपाला व्यावसायिकांसाठी हक्काची जागी दिली आहे. परंतु अनेक व्यावसायिक हे याठिकाणी व्यवसाय करण्याबरोबरच रस्त्यावरदेखील व्यवसाय थाटत आहेत. येथील मुख्य रस्त्याने वाहन चालविणेदेखील कठीण होत आहे. व्यवसाय करण्यासाठी मनपाच्या वतीने येथील व्यावसायिकांना स्वतंत्र झोन दिला असतानाही याकडे कानाडोळा करीत सर्रासपणे भाजीपाला तसेच फळविक्रेते हे रस्त्यावरच व्यवसाय करीत असल्याने वाहनधारकांची यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. याबरोबरच दत्त चौक, उपेंद्रनगर, त्रिमूर्ती चौक, संभाजी चौक, कामटवाडे, माउली लॉन्स, अंबड येथील भाजीबाजार याठिकाणीही अशीच परिस्थिती असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
जिजामाता भाजी मार्केट, पवननगर
पवननगर येथील जिजामाता भाजी मार्केटमध्ये नागरिकांना याठिकाणी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील मार्केटमध्ये शौचालय नसल्याने अनेकजण हे उघड्यावरच बसत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. तसेच भाजीबाजारालगत असलेल्या मुख्य रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने त्यापुढे ग्राहक हे त्यांची वाहने लावत असल्याने निम्म्याहून अधिक रस्ता अतिक्रमणात जात असल्याने वाहनधारकांना यातून मार्ग काढणेदेखील कठीण होत आहे. याबरोबरच भाजी मार्केटच्या आतील भागातही व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याचे दिसून आले. भाजी मार्केट परिसरात एका मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात घाण साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title:  The old Cidco Shopping Center area covers the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.