शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वर नव्हे, नाशिक ‘कुल सिटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:21 IST

थंड हवेचे ठिकाण म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही मागील दोन दिवसांपासून नाशिक ‘थंड’ झाले आहे. सातत्याने किमान तापमानाचा पारा घसरत असल्याने शनिवारीदेखील (दि.१४) नाशिकमध्ये राज्यात तापमानाची सर्वांत नीचांकी नोंद झाली. पहाटेपासून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहर दाट धुक्यात हरविलेले होते.

ठळक मुद्देराज्यात नीचांकी ; तापमानाचा पारा घसरलादाट धुक्यात हरवले शहर

नाशिक : थंड हवेचे ठिकाण म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही मागील दोन दिवसांपासून नाशिक ‘थंड’ झाले आहे. सातत्याने किमान तापमानाचा पारा घसरत असल्याने शनिवारीदेखील (दि.१४) नाशिकमध्ये राज्यात तापमानाची सर्वांत नीचांकी नोंद झाली. पहाटेपासून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहर दाट धुक्यात हरविलेले होते.मागील काही दिवसांपासून शहराच्या किमान तापमानात अचानकपणे घसरण होण्यास सुरुवात झाली आणि थंडीचा कडाकाहीवाढला. यामुळे नाशिककरांना बोचरी थंडी अनुभवयास येत आहे. यामुळे नाशिककरांनी उबदार कपड्यांचा वापर सुरू केला आहे. शहराचे वातावरण ‘कुल’ झाल्याने सकाळी जॉगर्सची संख्याही काही प्रमाणात रोडावल्याचे चित्र आहे. तसेच आजूबाजूला शेकोट्याही सकाळ-संध्याकाळ पेटलेल्या पहावयास मिळत आहे.गोदाकाठावर राहणारा स्थलांतरित मजूरवर्ग गारठ्यापासून बचाव करण्यासाठी रात्रभर शेकोट्यांपासून ऊब मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. सकाळच्या वेळेस दैनंदिन कामकाज करणारे दूधविक्रेते, पेपरविके्रते, शालेय मुलांची वाहतूक करणारे वाहनचालक तसेच विद्यार्थी थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वत:चे ‘पॅकअप’ करूनच घराबाहेर पडत असल्याचे दृश्य मागील दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहे. शनिवारी पहाटेपासून सकाळी ७.३० वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात दवबिंदूंचा वर्षाव झाला. तसेच दाट धुक्याची चादर शहरावर पसरल्याने रस्ते अदृश्य झाले होते. वाहनचालकांकडून सर्व दिवे सुरू करून वाहने रस्त्यावरून चालविली जात होती. साडेआठ वाजेच्या सुमारास सूर्यनारायणाचे काहीसे दर्शन नाशिककरांना घडले आणि धुक्याची दुलई हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली. सकाळी १० वाजेपर्यंत वातावरणात गारवा कायम होता. तसेच सायंकाळीदेखील वातावरण थंड झाले होते. रात्री थंडीचा कडाका पुन्हा जाणवू लागल्याने नाशिककरांनी उबदार कपड्यांचा आधार घेत पंखे, वातानुकूलित यंत्रांच्या वापरावर जणू स्वयंस्फूर्तीने बहिष्कार टाकणे पसंत केले.

टॅग्स :Nashikनाशिकenvironmentपर्यावरण