नाशिक : ‘नीट’ परीक्षेचा पेपर फूट प्रकरणी अटकेत असलेल्या शुभम खैरनार याने दोन ते तीन वर्षांपासून शहरातील उच्चभ्रू कॅनडा कॉर्नर परिसरात ‘एस.आर. एज्युकेशन कन्सलटन्सी’ या नावाने ‘दुकान’ मांडले होते. त्याच माध्यमातून तो वैद्यकिय प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली सावज शोधत असल्याचा संशय पोलिसांना आहे.
‘आम्ही विद्यार्थ्यांना करिअरसाठी मदत करतो..’ अशाप्रकारे स्वत:चे दुकान चालविणाऱ्या शुभम याने या कन्सलटंसी कार्यालयाची सोशलमिडियावर तसेच अन्य सर्व ऑनलाइन पर्यायांचा वापर करत जोरदार प्रसिद्धी आणि ब्रॅण्डिंग सुरु केले होते.
रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंत ऑनलाइन, ऑफलाइन अचूक मार्गदर्शन, नीट, जेईई, सीईटीसारख्या परिक्षांची माहिती, बँक कर्ज, शिष्यवृत्तीबाबत मार्गदर्शन, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत अशी स्वत:ची वैशिष्ट्ये सांगून शुभमने बस्तान मांडले होते.
शुभम याच्या कथित कन्सल्टन्सीचा कारभार नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, पुणे, अकोला, बंगळुरु व भोपाळ या शहरांमध्येसुद्धा सुरू असल्याचे तिथे लावलेल्या फलकांवर नमूद केले आहे.
शुभमला दोन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड
मुंबई : नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात नाशिकमधून अटक करण्यात आलेल्या शुभम खैरनारला बुधवारी मुंबई न्यायालयाने दोन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड दिला. केंद्रीय तपास यंत्रणेने मंगळवारी उशिरा रात्री नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील रहिवासी शुभमला
ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला दिल्लीला नेण्याची आवश्यकता असल्याचे सांगत सीबीआयने ट्रान्झिट रिमांडची मागणी केली होती.
धाकट्या भावाकडे सापडले होते पिस्तूल शुभमचा सख्खा धाकटा भाऊ भावेश मधुकर खैरनार याला दोन महिन्यांपूर्वी नांदगाव पोलिसांनी ‘गावठी कट्टा’ बाळगल्याप्रकरणी अटक केली होती.
‘कॅनडा कॉर्नर’ला पसंती
कॅनडा कॉर्नर हा शहरातील उच्चभ्रू व उच्चशिक्षितांचा वावर असलेला परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात मोठ्यासंख्येने सर्व प्रकारचे शैक्षणिक क्लासेस, महाविद्यालये आहेत. त्यामुळे इथे ‘हायप्रोफाइल’ सावज सहज मिळू शकेल या विचाराने शुभमने तेथेच पद्धतशीरपणे आपले ‘दुकान’ मांडले. विशेष म्हणजे भोंदू अशोक खरात यानेसुद्धा याच भागात कार्यालय थाटले.
लातुरात ६ जणांची चौकशी
लातूर : नीट प्रकरणात लातूर पोलिसांनी बुधवारी सहा जणांची चौकशी केली. त्यात समुपदेशक, विद्यार्थी, कोचिंग क्लासेस संबंधित व्यक्ती अशा एकूण सहा जणांचे जबाब नोंदविण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
नीट प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू आमचे पोलिस पूर्ण सहकार्य करतील. भारत सरकार आणि नीट परीक्षा घेणा-या संस्थेचा मी आभारी आहे कारण त्यांनी पेपरफुटी प्रकरणाला अतिशय गंभीरतेने घेतले आहे. मुले या परीक्षेसाठी भरपूर अभ्यास करतात. त्यात जर असे होत असेल तर ते योग्य नाही. जे अपराधी असतील त्यांच्यांवर कारवाई करण्यासाठी पूर्ण सहकार्य करू.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
Web Summary : Shubham Khairnar, arrested in the NEET paper leak case, ran a consultancy in Nashik, allegedly scouting for students seeking medical admissions. He heavily promoted his services online, offering guidance and assistance. His operations extended to multiple cities. He is now in transit remand.
Web Summary : नीट पेपर लीक मामले में गिरफ्तार शुभम खैरनार नासिक में कंसल्टेंसी चलाता था, कथित तौर पर मेडिकल प्रवेश चाहने वाले छात्रों की तलाश करता था। उसने ऑनलाइन अपनी सेवाओं का प्रचार किया और मार्गदर्शन दिया। उसका कारोबार कई शहरों तक फैला था। वह अब ट्रांजिट रिमांड पर है।