शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
2
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
3
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
4
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
5
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
6
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
7
मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
8
"तेरा गम मेरा गम एक जैसा सनम..." शाहरुख खान-प्रीती झिंटाच्या संघावर आली हे गाणं गुणगुणण्याची वेळ
9
बाप रे! एसी सुरू करताच थंड हवेऐवजी बाहेर आले ३ विषारी साप; समोरचे दृश्य पाहून कुटुंबाची उडाली झोप
10
कर्ज वेळेपूर्वी फेडताय? थांबा, क्रेडिट स्कोअरवर होईल परिणाम
11
ओठ सुजले, अंगावर लाल चट्टे... हळद लागताच कपलची तब्येत बिघडली, नवरी थेट व्हेंटिलेटरवर
12
Russian Oil Imports: भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच
13
IPL 2026: विकेट नको, फक्त दहशत हवी! गुजरात टायटन्सचा 'नेहरा पॅटर्न', फलंदाजांच्या मनात भरली धडकी
14
दिलजीत दोसांझ भारतीय नाही? ४ वर्षांआधीच स्वीकारलं अमेरिकेचं नागरिकत्व; का होतेय चर्चा?
15
NEET पेपर लीकचा 'मास्टरमाइंड' शुभम नाही तर कोण? राजस्थान ते नाशिक धागेदोरे; २ ते ५ लाखांत फुटला पेपर!
16
Katie Archibald: रुग्णांची सेवा करण्यासाठी स्पोर्ट्स करिअरवर सोडलं पाणी; स्टार खेळाडूची जगभरात चर्चा!
17
कोकणात जाण्यासाठी १२ तास ‘यातनांचा प्रवास’, त्याआधी १० तास प्लॅटफॉर्मवर मुक्काम
18
Ritual : जेवणाआधी 'हा' श्लोक म्हटल्याने तुमची Over Eating ची सवय मोडेल, निरोगी आयुष्य लाभेल!
19
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
20
पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळेच; 'जेजे'ने पोलिसांना अहवाल दिल्याची सूत्रांची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे! एसी सुरू करताच थंड हवेऐवजी बाहेर आले ३ विषारी साप; समोरचे दृश्य पाहून कुटुंबाची उडाली झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 13:42 IST

भीषण उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी जेव्हा आपण एसी लावतो, तेव्हा त्यातून थंड हवा येईल अशीच आपली अपेक्षा असते. मात्र, गुजरातच्या ...

भीषण उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी जेव्हा आपण एसी लावतो, तेव्हा त्यातून थंड हवा येईल अशीच आपली अपेक्षा असते. मात्र, गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील पारडी भागात एका कुटुंबाला असा अनुभव आला की, त्यांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडाली. एसी सुरू करताच त्यातून एक-दोन नव्हे, तर चक्क तीन विषारी साप बाहेर डोकवू लागले. हा प्रकार पाहताच घरातल्यांच्या तोंडचे पाणी पळाले आणि एकच किंकाळी फुटली.

नेमकं काय घडलं?

वलसाडच्या पो रेल्वे परिसरात राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाने दुपारी एसी सुरू केला. थोड्याच वेळात एसीच्या वेंट्समधून काहीतरी हालचाल होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. नीट निरखून पाहिलं असता तिथे सापाचे वेटोळे असल्याचा भास झाला. एकामागून एक तीन साप एसी युनिटमध्ये रेंगाळताना दिसले. घरात मुले आणि महिला असल्याने मोठी भीती पसरली होती. मात्र, कुटुंबाने तत्काळ सावधानता बाळगत एसी बंद केला आणि खोलीबाहेर धाव घेतली.

रेस्क्यू टीमही झाली अवाक्!

घटनेची माहिती मिळताच स्थानिक जीवदया एनजीओच्या सर्प मित्रांना बोलावण्यात आले. रेस्क्यू टीमने जेव्हा एसी युनिट उघडले, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. एकाच एसीमध्ये तीन विषारी साप इतक्या सुरक्षितपणे कसे काय बसले होते, हे पाहून तज्ज्ञही चकित झाले. बराच वेळ चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशननंतर तिन्ही सापांना सुरक्षितरीत्या बाहेर काढून जंगलात सोडण्यात आले.

एसीमध्ये साप आले कुठून?

साप एसीमध्ये कसे शिरले, याचे गूढ अद्याप कायम आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते एसीच्या ड्रेन पाईप किंवा भिंतीमधील एखाद्या फटीवाटे हे साप आत शिरले असण्याची दाट शक्यता आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, तो पाहून नेटकऱ्यांच्याही अंगावर काटा येत आहे.

'या' टिप्स फॉलो करा:

भीषण उष्णतेत साप थंड आणि ओलावा असलेल्या जागांच्या शोधात असतात. एसी युनिट त्यांच्यासाठी हक्काची जागा ठरू शकते. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. एसीच्या ड्रेन पाईपच्या तोंडाशी बारीक जाळी बसवून घ्या. एसीची वेळोवेळी सर्व्हिसिंग करत राहा, जेणेकरून आत काही अडकले असल्यास समजेल. घराभोवती झुडपे किंवा कचरा साचू देऊ नका, तिथे साप आश्रय घेऊ शकतात. बराच काळ बंद असलेला एसी सुरू करण्यापूर्वी युनिटची बारकाईने तपासणी करा.

English
हिंदी सारांश
Web Title : Snakes emerge from AC instead of cool air, family terrified!

Web Summary : A Gujarat family's AC blew out three venomous snakes instead of cool air. Rescue teams safely removed the reptiles from the unit, suspected to have entered through drain pipes. Experts advise precautions, including mesh on pipes and regular servicing.
टॅग्स :Gujaratगुजरातsnakeसाप