1 / 5ब्रिटनची सर्वात यशस्वी आणि दिग्गज सायकलपटूंपैकी एक असलेली तीन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती केटी आर्चीबाल्ड हिने अचानक निवृत्ती जाहीर केली. यंदा होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी देखील स्कॉटलंड संघात तिचा समावेश होता.2 / 5३२ वर्षीय केटीने ट्रॅकचा कायमचा निरोप घेत स्वतःची नवी वाट निवडली. ती आता एक नर्स (परिचारिका) म्हणून रुग्णांची सेवा करताना दिसेल. केटीने सांगितले की, बऱ्याच 'खऱ्या काळापासून जगाचे' आकर्षण तिला ओढत होते. ज्या जगाला ती ओळखते, ज्यात ती पारंगत आहे, ते जग सोडायला ती घाबरत होती. पण, आता तिच्या मनात कोणतीही भीती उरलेली नाही.3 / 5आपल्या नवीन प्रवासाबद्दल केटीने सांगितले की, ती सध्या नर्स बनण्याचे प्रशिक्षण घेत आहे. जेव्हा लोकांना मदतीची नितांत गरज असते आणि ते तुमच्यावर विश्वास ठेवू शकतात, तेव्हा त्यांच्यासाठी ती विश्वासार्ह व्यक्ती बनणे हा एक खूप खास अनुभव असतो.4 / 5या भावनिक प्रसंगी केटीने तिच्या प्रवासासाठी प्रशिक्षक, संघसहकारी आणि कुटुंबाचे आभार मानले. तिने विशेषतः तिची आई आणि दिवंगत जोडीदार रॅब वार्डेल यांच्या स्मृतींना उजाळा दिला. २०१२ मध्ये वयाच्या ३७ व्या वर्षी रॅबचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. केटी म्हणाली की, रैंबनेच तिला शिकविले होते की आयुष्यात रिलॅक्स राहणे आणि मजा करणे यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही.5 / 5केटीने वयाच्या १९ व्या वर्षी ब्रिटनच्या 'एंड्युरन्स स्क्वाड'मध्ये स्थान मिळविले होते. तिने १३ वर्षांच्या कारकिर्दीत ५१ प्रमुख पदके जिंकली. तिच्या नावावर दोन ऑलिम्पिक सुवर्ण, एक रौप्य, ७ विश्वविजेतेपद, विक्रमी २१ युरोपियन टायटल्स व एक राष्ट्रकुल सुवर्णपदक आहे.