Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026: विकेट नको, फक्त दहशत हवी! गुजरात टायटन्सचा 'नेहरा पॅटर्न', फलंदाजांच्या मनात भरली धडकी

Gujarat Titans: आयपीएलमध्ये प्रत्येक संघातील गोलंदाज विकेट्स घेण्यासाठी धडपडत असताना गुजरातच्या संघ वेगळ्याच रणनीतीसह गोलंदाजी  करताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:15 IST

Open in App

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात भारताचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहराच्या प्रशिक्षणाखाली गुजरातच्या संघाने एक वेगळीच दहशत निर्माण निर्माण केली. स्पर्धेत इतर संघाचे गोलंदाज धावा रोखण्यासाठी धडपड करत असताना गुजरातचा संघ नव्या पॅटर्नसह विरुद्ध संघाची भिडत आहेत. गुजरातचे गोलंदाज विकेट किंवा धावा रोखण्याचा प्रयत्न करत नसून फलंदाजांचा फक्त फलंदाजांचा कॉन्फिडन्स डाऊन करण्यावर भर देत आहेत, ज्याचा फायदा त्यांना झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

गुजरात टायटन्सचे गोलंदाज फलंदाजांना बाद करण्याची घाई करत नाहीत. तर, टेस्ट मॅच स्टाईल गोलंदाजी करून फलंदाजांना गुडघे टेकण्यास फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडत आहेत. मोहम्मद सिराज आणि कगिसो रबाडा जेव्हा नवीन चेंडूसह गोलंदाजीसाठी येतात, तेव्हा फलंदाज धावा करण्यापेक्षा स्वतःचा बचाव कसा करायचा? याचाच जास्त विचार करतात. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णा, जेसन होल्डर आणि अर्शद खान यांसारखे गोलंदाज फलंदाजांना सावरण्याची संधीच देत नाहीत.

वेगवान गोलंदाजांची फॅक्टरी

गुजरातच्या या यशाचे खरे सूत्रधार संघाचे हेड कोच आशिष नेहरा आहेत. नेहरा यांनी गुजरात टायटन्सला केवळ एक संघ न ठेवता वेगवान गोलंदाजांची फॅक्टरी बनवली आहे. गुजरातकडून खेळणाऱ्या अनेक गोलंदाजांचे भविष्य घडल्याचे आपण पाहिले आहे. आशिष नेहरा यांच्या मते, "जर फलंदाज आरामात शॉट खेळत असेल, तर गोलंदाज योग्य गोलंदाज करत नाही."

डेथ ओव्हर्समधील खास रणनीती

डेथ ओव्हर्समध्ये जिथे बाकी संघ यॉर्करचा शोध घेतात, तिथे गुजरातचे गोलंदाज हार्ड लेन्थवर गोलंदाजी करतात. या लेन्थवर चेंडू छातीपर्यंत उसळतो, ज्यामुळे फलंदाजाचा मोठा फटका अपयशी ठरत आहेत आणि आपली विकेट गमावत आहेत. जेव्हा फलंदाजाला वाटते की वेगवान गोलंदाजी संपली, तेव्हा त्यांच्यासमोर राशिद खान येतो. गुजरातचे गोलंदाज विकेट घेण्यापेक्षा फलंदाजाला चूक करण्यास भाग पाडतात.

गुजरात टायटन्सची दहशत

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुजरातचा हा दबदबा केवळ अहमदाबादच्या घरच्या मैदानावर मर्यादित नाही. इतर शहरांमध्येही त्यांची हीच क्रिकेट फिलॉसॉफी यशस्वी ठरत आहे. जेव्हा संपूर्ण जग टी-२० मध्ये फटकेबाजीचा आनंद घेत आहे, तेव्हा आशिष नेहरांची  गुजरातचा संघ फलंदाजांना आठवण करून देत आहे की, आजही वेगवान गोलंदाजी हाच क्रिकेटमधील सर्वात मोठे आव्हान आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: Gujarat Titans' 'Nehra Pattern' Instills Fear in Batsmen

Web Summary : Under Ashish Nehra, Gujarat Titans focus on unsettling batsmen rather than just taking wickets. Their strategy involves sustained pressure and forcing errors, proving fast bowling remains a potent force, successful even away from home.
टॅग्स :आयपीएल २०२६गुजरात टायटन्सऑफ द फिल्डआशिष नेहराशुभमन गिलमोहम्मद सिराज