नाशिक/पंचवटी - आडगाव येथील वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी (दि. २७) सकाळी ९ वाजता अपघात घडला. खाली डोकावून पाहत मजल्यावरून असताना, वरच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य वाहतूक करणारी ड्रमवेटर लिफ्ट अचानक खाली आल्याने एका कामगार महिलेची मान त्यात अडकून ती गंभीर जखमी झाली. रात्री १० वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर महिलेच्या मुलाने रुग्णालयात आईची अवस्था पाहून आक्रोश केला. तेव्हा, महिला लिफ्टमध्येच अडकली होती. माझ्या आईचा जीव गेला रे... म्हणत तो ओक्साबोक्सी रडू लागला. त्याने रुग्णालयाच्या कामकाजावर संताप व्यक्त केला. थरकाप उडविणाऱ्या या प्रसंगाने रुग्णालय प्रशासनची धावपळ उडाली. १० मिनिटे लिफ्टखाली मान अडकून होती. ज्योती शिवाजी अहिरे (५०) असे मृत महिलेचे नाव असून, तिच्यावर त्याच रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या १५ वर्षांपासून रुग्णालयात मावशी म्हणून कार्यरत होत्या.
ज्योती अहिरे लिफ्टजवळ आल्या. खाली डोकावत असताना ज्योती अहिरे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले ड्रमवेटर लिफ्ट वरतून लिफ्ट आल्याने मान अडकली.
ड्रमवेटर लिफ्ट म्हणजे नेमके काय ?
ही एक लहान आकाराची लिफ्ट असते, जी प्रामुख्याने वस्तू किंवा सामान एका मजल्यावरून दुसन्य मजल्यावर वाहून नेण्यासाठी वापरली जाते. ही सामान्य लिफ्टपेक्षा खूप लहान असते आणि बहुतेकदा कमरेच्या उंचीची असते. या लिफ्टचा वापर मोठे रुग्णालये, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये होतो. किचनमधून जेवण वर आणण्यासाठी, भांडी खाली नेण्यासाठी प्रामुख्याने वापर केला जातो.
कंत्राटी कामगार असलेल्या महिलेच्या मृत्यूने हळहळ
अचानक घडलेल्या या घटनेमुळे ज्योती अहिरे यांच्या प्रकृतीची स्थिती गंभीर बनली होती. या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश पाटील व बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले. माने नगर परिसरातील रहिवासी असलेल्या अहिरे या मविप्र रुग्णालयात कंत्राटी कामगार होत्या. सोमवारी सकाळी त्या रुग्णालयात पहिल्या मजल्यावर असताना समोर असलेल्या लिफ्ट खड्यासमोर उभ्या राहून खाली डोकावून बघत होत्या त्याचवेळी वरच्या मजल्यावरची ड्रमवेटर लिफ्ट खाली आली त्यावेळी अहिरे यांच्या लक्षात न आल्याने त्यांची मान अडकली. त्यात अडकल्याने रुग्णालयात हजर असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना तत्काळ जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयातच उपचारासाठी दाखल केले.
लिफ्टमध्ये मान अडकल्याने अहिरे या गंभीर जखमी झाल्या होत्या. ही घटना काही तांत्रिक बिघाडामुळे झाली का, याचा तपास आडगाव पोलिस करत असून, या प्रकाराने रुग्णालय परिसरात संबंधित महिला कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांची मोठी गर्दी झाली होती.
सकाळपासूनच त्यांची प्रकृती अत्यव्यस्थ झाली होती. त्याच्या मनक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शस्त्रक्रियेसाठी लागणारे ड्रम वाहून नेणाऱ्या हॉइस्ट ट्रॉलीत कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचे शासकीय विद्युत अभियंत्यांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जखमी महिला कर्मचाऱ्याने सुरक्षा नियमांचे पालन न करता डोकावून पाहिल्यावर हा अपघात झाला आहे. त्यांच्या मणक्यास इजा झाली. झालेल्या प्रकाराची चौकशी रुग्णालय प्रशासन करीत आहे. विद्युत अभियंता यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता ट्रॉली कोसळलेली नाही किंवा त्यामध्ये तांत्रिक बिघाडही झालेला नाही.
-डॉ.सुधीर भामरे
मी आईला सकाळी रोजच्या ड्युटीसाठी रुग्णालयात सोडून गेलो. काही वेळात तिचा बीपी लो झाल्याचा फोन आला; मात्र प्रत्यक्षात लिफ्टचा अपघात झाला होता. पाहतो तर काय आईला खूप लागले होते, तेव्हा डॉक्टर जागेवर नव्हते. या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई व्हावी. घटनास्थळी गेलो तेव्हा तेथे डॉक्टर तसेच जबाबदार कुणीही आढळून आले नाही. त्यामुळे प्रकरणाची चौकशी करावी.
महेंद्र अहिरे, जखमी महिलेचा मुलगा
Web Summary : In Nashik, a hospital worker died after getting trapped in a drum elevator. Her son expressed anguish at the hospital, alleging negligence. The 50-year-old woman was a contract worker. An investigation is underway to determine the cause of the accident.
Web Summary : नाशिक में, एक अस्पताल कर्मचारी की ड्रम लिफ्ट में फंसने से मौत हो गई। बेटे ने अस्पताल पर लापरवाही का आरोप लगाते हुए दुख व्यक्त किया। 50 वर्षीय महिला एक अनुबंध कर्मचारी थी। दुर्घटना के कारणों का पता लगाने के लिए जांच जारी है।