The murder of a married man on Maldhakkorod | मालधक्कारोडवर विवाहितेचा खून
मालधक्कारोडवर विवाहितेचा खून

नाशिकरोड : देवळालीगाव मालधक्कारोड गुलाबवाडी येथे एका विवाहितेचा अज्ञात संशयितांनी हत्याराने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फरार संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळालीगाव मालधक्कारोड गुलाबवाडी येथे भाडेतत्त्वावर एका खोलीत राहणारी विवाहिता भारती संतोष उर्फ गुजर (३५) ही तिच्या घरात शनिवारी (दि.९) सकाळी मृतावस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. प्रारंभी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मयत भारतीच्या डोके, कपाळ, तोंडावर तसेच गुडघ्याच्या खाली पायावर आणि गुप्तांगावर हत्याराने वार करून तिचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

Web Title: The murder of a married man on Maldhakkorod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.