शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक अपक्ष नाशिक पश्चिम, नांदगावमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 00:30 IST

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, १४८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीमध्ये ७२ अपक्ष उमेदवारदेखील नशीब आजमावत आहेत. सर्वाधिक अपक्षांची संख्या नाशिक पश्चिम आणि नांदगावमध्ये प्रत्येकी ११ इतकी आहे.

ठळक मुद्देसर्वांत कमी म्हणजे केवळ एकच अपक्ष कळवण आणि निफाड मतदारसंघात

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, १४८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीमध्ये ७२ अपक्ष उमेदवारदेखील नशीब आजमावत आहेत. सर्वाधिक अपक्षांची संख्या नाशिक पश्चिम आणि नांदगावमध्ये प्रत्येकी ११ इतकी आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अत्यंत कमी वेळ मिळूनही जवळपास २४५ उमेदवारांनी ३४५ इतके नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. छाननीअंती २१२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. युती, आघाडीच्या राजकारणात दररोज घडणाऱ्या घडामोडींमुळे अनेक महत्त्वाकांक्षी इच्छुकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्रत्यक्षात अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर असंख्य अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अर्ज माघारीनंतर अपक्षांची संख्या कायम राहिली. नांदगाव आणि नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक प्रत्येकी ११ अपक्ष असून, मालेगाव मध्यमध्ये दहा अपक्षांची उमेदवारी आहे. सर्वांत कमी म्हणजे केवळ एकच अपक्ष कळवण आणि निफाड मतदारसंघात आहे. मालेगाव बाह्यमध्ये ६, बागलाण ३, कळवण १, चांदवड ४, येवला ३, सिन्नर ३, निफाड १, दिंडोरी ०, नाशिक पूर्व ७, नाशिक मध्य ४, नाशिक पश्चिम ११, देवळाली ४, इगतपुरी ४ याप्रमाणे अपक्ष उमेदवारांची संख्या आहे.काही अपक्षांना थांबविण्यात अधिकृत उमेदवारांना यश आले असल्याने आता अपक्षांचे फारसे आव्हान कुठे नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nandgaon-acनांदगाव